शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

संत गजानन महाराज संस्थानविरुद्धची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 6:28 PM

Nagpur News शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानद्वारे आनंद सागर प्रकल्पामध्ये करण्यात आलेल्या कायमस्वरूपी बांधकामांविरुद्ध दाखल जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली.

ठळक मुद्देयाचिकाकर्त्यावर १० हजार रुपये दावा खर्चही बसवण्यात आला

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानद्वारे आनंद सागर प्रकल्पामध्ये करण्यात आलेल्या कायमस्वरूपी बांधकामांविरुद्ध दाखल जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. (The petition against Sant Gajanan Maharaj Sansthan was rejected)

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. अशोक गारमोडे असे याचिकाकर्त्याचे नाव असून, ते शेगाव येथील व्यावसायिक आहेत. ही निरर्थक याचिका दाखल केल्यामुळे गारमोडे यांच्यावर १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात आला, तसेच ही रक्कम १५ दिवसात उच्च न्यायालयातील विधिसेवा उपसमितीकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले.

राज्य सरकारने तलाव सौंदर्यीकरण व पाणी साठविण्यासाठी २२ सप्टेंबर १९९९ रोजी संत गजानन महाराज संस्थानला १०१.३२ हेक्टर जमीन १५ वर्षांकरिता लीजवर दिली होती. १९ जुलै २०१६ रोजी लीजची मुदत ३० वर्षाने वाढविण्यात आली. या जमिनीवर संस्थानने अवैधरीत्या आनंद सागर प्रकल्प उभारला आहे. राज्य सरकारने या जमिनीवर पूर्वपरवानगीशिवाय कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मनाई केली आहे. असे असताना संस्थानने विविध कायमस्वरूपी बांधकामे केली आहेत. त्याकरिता प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नाही. याशिवाय, पाणी साठवणुकीसाठी केवळ १० हेक्टर जमीन वापरली जात आहे. परिणामी, शासन निर्णयाची पायमल्ली झाली आहे.

यासंदर्भात २९ ऑक्टोबर २०१८ रोजी राज्य सरकारकडे तक्रार केली होती, पण काहीच कारवाई करण्यात आली नाही. करिता, न्यायालयाने यात हस्तक्षेप करून सरकारला आवश्यक निर्देश द्यावे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. संस्थानच्या वतीने ॲड. अरुण पाटील यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय