लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी रात्री झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे एका व्यक्तीचा बळी गेला. शेख रशीद शेख अखबर (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगा बाग दत्त चौक येथे राहत होते. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास ते त्यांच्या घरासमोर उभे असताना अचानक विजेचा कडकडाट झाला. त्यामुळे शेख बशीर चक्कर येऊन खाली पडले. त्यांना उपचाराकरता इस्पितळात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून पारडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपुरात विजेने घेतला इसमाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:37 IST