शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘बार’मधून ‘होम डिलिव्हरी’ची परवानगी : आजपासून मद्यविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 23:59 IST

राज्य शासनाने केवळ परमिट असलेल्या ग्राहकांना सीलबंद मद्यविक्री करण्याची ‘बीअरबार’ला परवानगी दिली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा होती. सोमवार २५ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम व अटींवर ‘बीअरबार’लादेखील मद्यविक्रीची परवानगी दिली आहे. यामुळे शहरातील ‘बीअरबार’ संचालक परमिटधारक ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’च्या माध्यमातून मद्यविक्री करु शकणार आहेत. मंगळवारी आदेशाची प्रत मिळण्यास उशीर झाल्याने बार बुधवारपासून उघडणार आहेत.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’मध्ये नवीन साठा बोलावू शकणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने केवळ परमिट असलेल्या ग्राहकांना सीलबंद मद्यविक्री करण्याची ‘बीअरबार’ला परवानगी दिली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा होती. सोमवार २५ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम व अटींवर ‘बीअरबार’लादेखील मद्यविक्रीची परवानगी दिली आहे. यामुळे शहरातील ‘बीअरबार’ संचालक परमिटधारक ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’च्या माध्यमातून मद्यविक्री करु शकणार आहेत. मंगळवारी आदेशाची प्रत मिळण्यास उशीर झाल्याने बार बुधवारपासून उघडणार आहेत.ग्रामीण भागातील ‘बीअरबार’ संचालकांना त्यांच्या काऊंटरवरूनच ग्राहकांना केवळ सीलबंद पार्सल सुविधा देण्याची परवानगी असेल. ही परवानगी ‘बार’चा साठा संपेपर्यंत व ‘लॉकडाऊन’च्या कालावधीपर्यंत मर्यादित असेल. मात्र ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत ‘बार’ संचालक मद्याचा नवीन साठा बोलवू शकणार नाहीत. मद्यविक्री करत असताना ‘बार’ संचालकांना सर्व नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे.शहरात जवळपास ३०० तर ग्रामीण भागात सव्वाशे ‘बीअरबार’ आहेत. या ‘बार’ मालकांना व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना‘ बार’ उघडण्याच्या परवानगीची प्रतीक्षा होती. बहुतांश ‘बार’मध्ये ‘बीअर’चा मोठ्या प्रमाणावर साठा होता. हा साठा ‘एक्स्पायर’ होतो की काय, अशी भीती संचालकांना होती. त्यामुळेच ‘बीअरबार’ संचालकदेखील ‘वाईनशॉप’च्या धर्तीवर ‘बार’मधून पार्सल विक्रीची परवानगी देण्याची सरकारकडे मागणी करत होते.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळाली मंजुरीजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ‘बीअरबार’लादेखील मंगळवारपासून मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र शहरात केवळ ‘होम डिलिव्हरी’ आणि ग्रामीण मध्ये बारमधूनच ‘एमआरपी’वर केवळ सीलबंद विक्री करता येणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदीonlineऑनलाइन