शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या पाण्याच्या अडथळ्याचा कायमस्वरूपी निचरा; नागपूर विभागाची शाश्वत अभियांत्रिकी यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:56 IST

पावसाळ्यापूर्वीच मार्ग सुगम व सुरक्षित करण्यात आला आहे.

नागपूर: मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने एलसी गेट क्रमांक 41 जवळील लिमिटेड हाइट सबवे (एलएचएस) मध्ये दीर्घकाळ चालू असलेली जलजमावाची समस्या कायमस्वरूपी सोडवून स्थानिक ग्रामस्थांना व वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. 27 मे 2025 रोजी हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला असून, पावसाळ्यापूर्वीच मार्ग सुगम व सुरक्षित करण्यात आला आहे.

सदर एलएचएस 2015 मध्ये एलसी गेट बंद केल्यानंतर सुरू करण्यात आले होते. मात्र नैसर्गिक निचऱ्याच्या अभावामुळे येथे पावसात नेहमीच पाणी साचून वाहतूक खोळंबत असे. दरवर्षी डिझेल पंपच्या सहाय्याने पाणी काढले जात होते, तरीही समस्या कायम होती. 2023 मध्ये नागपूर विभागाच्या अभियंत्यांनी 165 मीटर अंतरावर खाजगी शेतजमिनीमधून वाहणाऱ्या नाल्याचे निरीक्षण केले, ज्याचा खालचा स्तर एलएचएसच्या तुलनेत कमी होता. त्यामुळे ‘ट्रेंचलेस पाइप पुसिंग’ या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे 600 मिमी आरसीसी पाइपलाइन टाकण्यात आली, ज्यामुळे शेतजमिनीचे नुकसान टाळले गेले. या पाइपलाइनमध्ये निरीक्षण कक्ष देखील बसविण्यात आले आहेत.

या शाश्वत उपायामुळे आता वारंवार पाणी काढण्याची गरज भासणार नाही. पावसाळ्यातही मार्ग खुला राहील, ज्याचा फायदा शाळेची वाहने, आपत्कालीन सेवा व सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. या प्रकल्पाद्वारे नागपूर विभागाने लोककल्याण, दीर्घकालीन नियोजन आणि शाश्वत अभियांत्रिकी यामध्ये आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcentral railwayमध्य रेल्वे