शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लोहयुगीन काळात पश्चिम विदर्भात होती मानवी वस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 10:11 IST

लोहयुगीन काळातील वस्त्या या पूर्व विदर्भातच होत्या, असे आतापर्यंत मानण्यात येत होेते. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे अमरावती जिल्ह्यातील फुबगाव येथे सुरू असलेल्या खोदकामातून नवीन माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देपुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला आढळल्या खुणा ले-आऊट, भांडी, दागिन्यांचे अवशेष मिळाले

वसीम कुरेशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोहयुगीन काळातील वस्त्या या पूर्व विदर्भातच होत्या, असे आतापर्यंत मानण्यात येत होेते. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे अमरावती जिल्ह्यातील फुबगाव येथे सुरू असलेल्या खोदकामातून नवीन माहिती समोर आली आहे. पश्चिम विदर्भातदेखील लोहयुगीन काळात मानवी वस्ती होती ही बाब स्पष्ट झाली आहे. खोदकामादरम्यान लोहयुगीन ले आऊट, घरं, भांडी, दागिने, चुली, शेती इत्यादींशी संबंधित अवशेष प्राप्त झाले आहेत.जानेवारी महिन्यापासून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे पथक खोदकामाला लागले होते. तीन महिन्यांपर्यंत हे काम चालले. त्यानंतर येथे मिळालेल्या अवशेषांचा अभ्यास व संबंधित दस्तावेज तयार करण्यात आले. तेथे तीन ते चार हजार वर्षांअगोदर लोहयुगीन मानव मोठ्या घरांमध्ये राहत होते, हे खोदकामातून स्पष्ट झाले आहे. दहा बाय दहा मीटरच्या एकेका ले आऊटमध्ये गच्चीसाठी वापरण्यात आलेल्या बांबूंचे खोल खड्डेदेखील मिळाले आहेत. यासोबतच धान्य ठेवण्यासाठी असलेले मातीचे भांडे जसेच्या तसे मिळाले. जेवण तयार करण्यासाठीची चूल, शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडाच्या नांगराचा मोठा भागदेखील मिळाला. शिवाय पथकाला गवत कापण्याचे अवजार, जेवण बनविण्याचे सामान व भांड्यांचे प्राचीन अवशेषदेखील प्राप्त झाले आहेत. गाय, बैल इत्यादी जनावरांची हाडेदेखील मिळाली. त्या काळात मनुष्य जनावरांचे मांस भाजून किंवा तयार करून खात होते असादेखील खुलासा करण्यात आला आहे. त्या काळातील महिलांच्या दागिन्यांमध्ये लावण्यात येणारे विशेष दगडांचे आकर्षक डिझाईनवाले मणीदेखील सापडले आहेत.त्या काळात लोक आपल्या मुलांच्या मनोरंजनाला महत्त्व देत होते हेदेखील स्पष्ट झाले आहे. मुलांच्या खेळण्यांचे अवशेषदेखील सापडले आहेत.आणखी खोदकाम करणारविदर्भातील खापा व सावनेरच्या रिठीरांझना येथे लोहयुगीन वस्तीची माहिती मिळाली होती. मात्र पश्चिम विदर्भात असे काहीच आढळून आले नव्हते. खापा व रिठीरांझनाप्रमाणे फुबगाव येथे ‘कबरी’ मात्र आढळून आल्या नाहीत. फुबगाव पूर्णा नदीला लागून आहे. त्यामुळे पुरादरम्यान ‘कबरी’ वाहून गेल्या असण्याची शक्यता आहे. पुढील चरणात फुबगावमध्ये आणखी खोदकाम करण्यात येणार आहे. लोहयुगीन मानवाने राहण्यासाठी ही जागा का निवडली होती व त्यांचे राहणीमान नेमके कसे होते हे जाणून घेण्याचा यातून प्रयत्न होणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सहायक पुरातत्त्वशास्त्रज्ञ पी.पी.सोनोने यांनी दिली.नागपूरहून फुबगाव २१० किलोमीटर अंतरावर आहेखोदकामासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात आले.खोदकामादरम्यान विभागाचे २० सदस्य सहभागी झाले होते.दुसºया टप्प्यातील खोदकाम डिसेंबर २०१९ पासून सुरू होईल.

टॅग्स :historyइतिहास