शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागाची कामगिरी सुधारली : दहावीत मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 21:07 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्दे २६ टक्क्यांनी वाढला निकाल, विभाग सहाव्या क्रमांकावर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला. ‘कोरोना’मुळे भूगोल विषयाची परीक्षाच न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक होती. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा चक्क २६ टक्क्यांनी वाढला. संपूर्ण विभागाच्या निकालाची टक्केवारी ९३.८४ टक्के इतकीच आहे. यंदा राज्यात विभाग सहाव्या स्थानी आहे.विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७८ हजार ६८९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ३६८ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.७८ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ९१.९९ टक्के इतके आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ६१ हजार ३८८ पैकी १ लाख ५१ हजार ४४४ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून २० हजार ५२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी १९ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९५.२२ टक्के इतकी आहे. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी वर्धा जिल्ह्याची आहे. तेथे १६ हजार ७४२ पैकी केवळ १५ हजार ४१९ म्हणजे ९२.१० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत तेथील निकाल तब्बल २७ टक्क्यांनी वाढला आहे.जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारीजिल्हा निकाल (२०२०) निकाल (२०१९)भंडारा ९४.४१ %          ६५.९९ %चंद्रपूर ९२.४४ %         ६५.५८ %नागपूर ९४.६६ %        ७१.७४ %वर्धा ९२.१० %             ६५.०५ %गडचिरोली ९२.६९ % ५४.६५ %गोंदिया ९५.२२ %      ६८.४६ %

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालnagpurनागपूर