शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

बाधितांचा टक्का घसरतोय पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:09 IST

सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा/ मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, शुक्रवारी ...

सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ कामठी/ हिंगणा/ मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ५४७९ चाचण्यांमधून १७९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे ग्रामीण भागात संक्रमणाची टक्केवारी अद्यापही ३२.७९ टक्के असल्याचे स्पष्ट होते. अद्यापही अनेक तालुक्यात कोरोना चाचणी किटचा तुटवडा आहे, तर काही गावांत ग्रामस्थ घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तुटण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण आणि रुग्णांवर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत १६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या २०४१ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत १,२८,३४० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ९९,२०७ रुग्ण बरे झाले. शनिवारी ३०४० रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७,०१७ इतकी आहे.

सावनेर तालुक्यात ६६ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील १५ तर ग्रामीणमधील ५१ रुग्णांचा समावेश आहे. नरखेड तालुक्यात १३७ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील १६ तर ग्रामीण भागातील १२२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०४८, तर शहरात ४३९ इतकी झाली आहे. सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १८, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ४०, मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ५१, तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावांमधून १३ रुग्णांची नोंद झाली.

काटोल तालुक्यात ५२२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील २०, तर ग्रामीण भागातील ८६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारी सावंगा केंद्र अंतर्गत ४०, कोंढाळी केंद्र अंतर्गत ३०, तर येनवा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १६ रुग्णांची नोंद झाली.

कुही तालुक्यात १७८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात कुही येथे दोन, तर भामेवाडा व वेलतूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. उमरेड तालुक्यात ७३ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ४१, तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुत्यात २९२ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मौदा तालुक्यात १०८ चाचण्यापैकी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हिंगणा तालुक्यात ५५५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ५८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात वानाडोंगरी येथे सर्वाधिक २७ रुग्णांची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १०,९९५ झाली आहे. यातील ८,९०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्युसंख्या २३७ झाली आहे. रामटेक तालुक्यात २३ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील २, तर ग्रामीण भागातील २१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६३०७ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४८२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३९९ इतकी आहे.

कळमेश्वर तालुक्यात धोका वाढला

कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तालुक्यात १४२ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ३२ तर ग्रामीण भागातील ११० रग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मोहपा येथे १५, धापेवाडा (११), घोराड (८), आष्टीकला (७), कळंबी, गुमथळा, तेलगाव, उपरवाही येथे प्रत्येकी ५ रुग्णांची नोंद झाली. इतर लहान गावातही प्रत्येकी एक ते दोन रुग्णांची नोंद झाली.