शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पैशासाठी नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:15 IST

बुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटकंती करण्याची पाळी आली. एखाद्या एटीएममध्ये पैसे असल्याचे दिसले परंतु तेथेही बराच काळ रांगेत उभे राहून पैसे काढावे लागल्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप झाला.

ठळक मुद्दे‘नो कॅश’चे बोर्ड : एटीएममध्ये दुसऱ्या दिवशीही ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटकंती करण्याची पाळी आली. एखाद्या एटीएममध्ये पैसे असल्याचे दिसले परंतु तेथेही बराच काळ रांगेत उभे राहून पैसे काढावे लागल्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप झाला.मंगळवारपासून नागपूर शहरातील बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. बुधवारीही तीच परिस्थिती शहराच्या विविध भागात पाहावयास मिळाली. पैसे नसल्याच्या पाट्या अनेक एटीएमच्या बाहेर लावण्यात आल्या होत्या. पैशाचे काम असल्यामुळे अनेक नागरिक आपण राहत असलेल्या भागातून दुसऱ्या परिसरात एटीएमच्या शोधासाठी निघाले. परंतु तेथेही एटीएम रिकामे असल्याचे पाहून त्यांना रिकाम्या हाताने परतण्याची पाळी आली. काही एटीएममध्ये पैसे होते. परंतु तेथे नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. तर अनेक नागरिकांना उन्हात एटीएमच्या शोधात फिरावे लागले. शहराच्या अनेक भागातील एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट पाहावयास मिळाला. यात गोधनी रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये नेहमी पैसे राहतात. परंतु तेथेही आज पैसे नव्हते. छावणीच्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे नव्हते. पूनम चेंबर येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे नव्हते. सदर चौकातील इन्डसइंड बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिक परत गेले. एनआयटी कार्यालयाजवळील ई लाऊंज एटीएममध्ये पैसे नव्हते. सीताबर्डी परिसरातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्येही पैसे नव्हते. तर नंदनवन परिसरातील बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्याचे दिसले.महत्त्वाची कामे खोळंबलीशहराच्या विविध भागातील एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेक नागरिक सीताबर्डी परिसरात खरेदीसाठी आले होते. परंतु एटीएममध्ये पैसेच नसल्यामुळे त्यांना उन्हात फिरावे लागले. अखेर पैसे नसल्यामुळे बºयाच नागरिकांना खरेदीचा बेत रद्द करण्याची पाळी आली. तर अनेक नागरिकांची पैशाअभावी महत्त्वाची कामे खोळंबून पडल्यामुळे त्यांना मनस्ताप झाला.नागरिकांच्या प्रतिक्रिया...एटीएमच्या शोधात फिरावे लागले‘नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी सीताबर्डीला आलो होतो. परंतु खूप फिरूनही एटीएममधून पैसे निघाले नाहीत. त्यामुळे मोबाईल खरेदीचा बेत आज रद्द करावा लागला.’शेखर गौरखेडे, युवककिराणा खरेदी थांबली‘मी किराणा दुकानदार आहे. खरेदीसाठी सीताबर्डीला आलो होतो. येथे पैशासाठी एटीएममध्ये फिरलो. परंतु कुठेच पैसे नव्हते. पैसे काढण्यासाठी खूप फिरावे लागले.’वासु सोमणकर, व्यावसायिकखूप मनस्ताप झाला‘कुटुंबीयांसह सीताबर्डी परिसरात कपडे खरेदीसाठी आलो होतो. तीन-चार एटीएममध्ये शोध घेतला. परंतु कुठेच पैसे नव्हते. उन्हात पैशासाठी फिरावे लागले. एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे मनस्ताप झाला.संतोष वाढई, नागरिकखूप फिरावे लागले‘नंदनवन परिसरातील एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे खुप फिरावे लागले. दुसऱ्या भागातील एटीएममध्येही तीच परिस्थिती असल्यामुळे नाईलाज झाला. एटीएमच्या शोधात भर उन्हात फिरण्याची पाळी आली.’डॉ. आमीर खान, नागरिक

टॅग्स :atmएटीएमnagpurनागपूर