लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मांडली तीच मुळात जनजागृतीच्या उद्देशाने. आता गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले असले तरी जनजागृतीचा वसा मात्र कलावंतांनी सोडलेला नाही. शासकीय चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून ही मूर्ती साकारली असून सुरक्षित वाहतुकीचा संदेश ते यातून देत आहेत. नागपुरातील फे्रंडस् फॉरएव्हर या मंडळासाठी बनविण्यात आलेली ही मूर्ती दुचाकीवर स्वार असून विसजर्नानंतर जलप्रदूषण होऊ नये म्हणून ही दुचाकी पाण्यातून परत काढली जाणार आहे. ही मूर्ती व या विषयावरील एकूणच देखावा साकारण्यासाठी लाखाच्यावर खर्च आला आहे, असे मूर्तिकार राकेश पाठराबे यांनी सांगितले.
‘हेल्मेट’साठी लोकजागर
By admin | Updated: August 29, 2016 02:42 IST