शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 10:53 PM

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जनतेनेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिनकस्तूरचंद पार्क येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जनतेनेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. 

ऐतिहासिक कस्तूरचंद पार्कवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रध्वज वंदन करून सशस्त्र पोलीस दलाच्या पथसंचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना चंद्र्रशेखर बावनकुळे बोलत होते.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यावेळी उपस्थित होते.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून विविध जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काटोल, नरखेड या भागात लोकसहभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कामांना सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.राज्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये शेतकरी उद्योजक तसेच विविध उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व कामगार बंधूंचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लोकसभा निवडणुकीचा उत्सव नुकताच साजरा झाला असून, जनतेने लोकशाहीच्या या उत्सवामध्ये उत्साहात सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे हाताळल्याबद्दल जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अभिनंदन केले.यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, खा. डॉ. विकास महात्मे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक आणि जिल्हा व पोलीस प्रशासनाचे विविध अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर यांनी केले.पोलीस पथकाच्या परेडने वेधले लक्ष 
यावेळी परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस पथकाचे संचलन झाले. त्यांच्यासोबत सेकंड इन कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक प्रधान तर राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ चे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोर्ला, गडचिरोलीचे दिलीप तरारे, गोंदियाचे अरुण धुळसे, नागपूर शहर सशस्त्र पोलीस दल शशिकांत नागरगोजे, नागपूर ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, लोहमार्ग पोलिसचे विनोद तिवारी, नागपूर शहर (महिला) पोलिसचे उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे, राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाचे घनश्याम दुजे, वाहतूक शाखेचे जितेंद्र्र ठाकूर, होमगार्ड जिल्हा समादेशकचे प्लाटून कमांडर रोशन गजभिये आणि संजीवनी बोदेले, बँड पथकाचे प्रदीप लोखंडे, रामू ससाने, संजय पंचभुते, चंद्रकांत मानवटकर, सुरेश सनेश्वर, श्वान पथक ‘जीवा’सह शिवशंकर जोशी, ‘वज्र’चे वीरेनशहा खंडाते, बॉम्ब नाशक पथकाचे विजय मैंद, वरुण वॉटर कॅनॉनचे संतोष श्रीवास, अग्निशमन दलाचे विनोद जाधव आणि सामान्य रुग्णालयाच्या डॉ. रोहिना शेख यांचा पथसंचलनात सहभाग होता.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनguardian ministerपालक मंत्रीKasturchand Parkकस्तूरचंद पार्क