शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अमरावतीमधील प्रलंबित वैद्यकीय प्रकल्प मार्गी लागणार; महसूलमंत्री बावनकुळेंचे उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

By योगेश पांडे | Updated: December 13, 2025 18:52 IST

Nagpur : या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, नागपूर आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाशी संबंधित प्रलंबित कामे आणि प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. विधानभवनात शनिवारी वैद्यकीय प्रकल्पांसंदर्भात उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, नागपूर आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि शासकीय दंत महाविद्यालयाच्या विविध विकासाकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मेडिकलच्या टी.बी. वॉर्ड परिसरात कर्करुग्णालयासाठी एक मजला वाढवून मिळणे, सिकलसेल आणि थॅलेसिमिया हॉस्पिटलचे बांधकाम, तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन निवासस्थानांच्या बांधकामाला गती देण्यावर चर्चा झाली. तसेच, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 'ए', 'बी' आणि 'सी' विंगमधील अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटरच्या अद्ययावतीकरणाचे काम करण्याच्या हालचालींचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना या सर्व कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मेयोच्या पदभरतीसंदर्भात चर्चा

मेयो रुग्णालयातील वाढीव १३६० खाटांच्या क्षमतेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि बाह्यस्त्रोतामार्फत पदभरती करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार वर्ग १ ते वर्ग ४ ची पदे मंजूर करणे आणि ५२६ सफाई कामगारांची रिक्त पदे भरण्यावर भर देण्यात येणार आहे.

अमरावतीतील महाविद्यालयासाठी यंत्रसामुग्री खरेदी होणारअमरावतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२५-२६ या वर्षात दुसऱ्या वर्षाच्या एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता आणि निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश बावनकुळे यांच्याकडून देण्यात आले.

आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेश क्षमता वाढण्याचे संकेत

नागपूरच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता १०० वरून २०० पर्यंत वाढवणे आणि चार नवीन विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नवीन इमारतींचे बांधकाम व २१४ नवीन पदांची निर्मिती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur-Amravati Medical Projects to Proceed; Minister Bawankule Issues Directives

Web Summary : Pending medical projects in Nagpur and Amravati are set to advance. Minister Bawankule directed officials to expedite works related to medical colleges, hospitals, and infrastructure upgrades. Discussions included expanding facilities, filling staff vacancies, and procuring equipment for improved healthcare services.
टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूरAmravatiअमरावती