शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

प्रलंबित खटल्याचा निपटारा तातडीने होणार: मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:10 AM

केंद्र सरकारने ‘सबका विश्वास योजना’ आणली आहे. १ सप्टेंबरला सुरू झालेली ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. योजनेंतर्गत सर्व विवाद निघाली निघेल, असा विश्वास सीमा शुल्क आणि जीएसटी नागपूर विभागाचे मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्दे ‘सबका विश्वास योजना’, व्याज व दंडाची सूट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जीएसटी लागू झाल्यानंतर सेवाकर प्रकरणातील प्रलंबित खटले निकाली निघणे आवश्यक असते. याकरिता केंद्र सरकारने ‘सबका विश्वास योजना’ आणली आहे. १ सप्टेंबरला सुरू झालेली ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील. योजनेंतर्गत सर्व विवाद निघाली निघेल, असा विश्वास सीमा शुल्क आणि जीएसटी नागपूर विभागाचे मुख्य आयुक्त एच.आर. भीमाशंकर यांनी येथे व्यक्त केला.आयसीएआयच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए शाखेतर्फे धंतोली येथील सभागृहात आयोजित संवाद कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.भीमाशंकर म्हणाले, योजनेत खटला, व्याज आणि दंडाची सूट आहे. न्यायनिर्णय वा अपिलामध्ये ५० लाखांपेक्षा कमी ड्युटी डिमांडमध्ये ७० टक्के आणि ५० लाखांवर ५० टक्के सूट आहे. अशीच सूट तपासणी वा ऑडिटमध्ये ३० जून वा त्यापूर्वी निर्धारित केलेल्या शुल्कावर मिळणार आहे. शिवाय थकबाकी रकमेच्या प्रकरणांमध्ये निर्धारित शुल्काच्या ६० टक्के जर रक्कम ५० लाखांच्या आत असेल तर आणि ५० लाखांवर ४० टक्के आणि ऐच्छिक प्रकटीकरण प्रकरणांमध्ये व्याज आणि दंड वगळता केवळ घोषित केलेली पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे.आयुक्त (अपील) संदीप पुरी यांनी योजनेचा लाभ आणि प्रकरणांचा निपटारा करण्यावर, तर सहआयुक्त मुकुल पाटील यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून योजनेची माहिती दिली. सीए वरुण विजयवर्गीय यांनी योजनेतील तरतुदींचे विश्लेषण केले. आयसीएआयच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर यांनी भीमाशंकर यांच्या दृष्टिकोनाची प्रशंसा केली. उपाध्यक्ष सीए किरीट कल्याणी यांनी आयोजनाचे समन्वयन केले. सचिव सीए साकेत बागडिया यांनी आभार मानले.याप्रसंगी जीएसटीचे संयुक्त आयुक्त नीलेश राऊतकर व बृजेंद्र चौधरी, उपायुक्त स्वचंद चौव्हान व स्वप्निल पवार, सहायक आयुक्त निखिल वडनाम, अधीक्षक सुरेश राऊलू, पिंटू मिश्रा, मिलिंद पांडे, अनिल पंडित, सागर जुगाडे, सीए अक्षय गुल्हाने, सीए संजय एम अग्रवाल, सीए जुल्फेश शाह, सीए ललित लोया, सीए सतीश सारडा, सीए मानव मोहोलकर, सीए राजेश काबरा, सीए आतिश धानुका, सीए गिरधारीलाल शर्मा आणि १२५ पेक्षा जास्त सीए उपस्थित होते.

टॅग्स :chartered accountantसीएnagpurनागपूर