ंनागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने प्रशासकीय कामकाजाच्या सुलभतेसाठी पेंचचे विभागीय वन अधिकारी (डीएफओ) कार्यालय रामटेक येथे स्थानांतरित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सोबतच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी यांनी काही अधिकार्यांच्या जबाबदार्यांमध्ये फेरबदल करून, प्रशासकीय कामकाजाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासंबंधी नुकतेच दोन दिवसांपूर्वी आदेश जारी झाले आहेत. या नवीन फेरबदलानुसार आतापर्यंत उमरेड-कºहांडला अभयारण्याची जबाबदारी सांभाळत असलेले सहायक वनसंरक्षक नंदकिशोर काळे यांच्यावर पश्चिम पेंच क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवाय बोर अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक उत्तम सावंत यांच्या खांद्यावर बोर, टीपेश्वर व उमरेड-कºहांडला अभयारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सीसीएफ रेड्डी यांनी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी हा फेरबदल केला असल्याची माहिती आहे. यानंतर आता लवकरच पेंचचे विभागीय वन अधिकारी कार्यालय रामटेक येथे स्थानांतरित केले जाणार आहे. त्यानंतर सध्या नागपुरातील मुख्य कार्यालयात बसणारे पेंचचे विभागीय वन अधिकारी व सहायक वनसंरक्षक रामटेक येथील विभागीय कार्यालयात जातील. आतापर्यंत पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयावर पेंच उद्यानासह मानसिंगदेव, उमरेड-कºहांडला, बोर व टीपेश्वर या चार अभयारण्याची जबाबदारी होती. परंतु अलीकडेच यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा हे नवीन अभयारण्य पेंच कार्यालयाशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे आता पेंच कार्यालयाचे कार्यक्षेत्र व जबाबदारी वाढली आहे. (प्रतिनिधी)
पेंचचे कार्यालय रामटेकच्या वाटेवर
By admin | Updated: May 12, 2014 00:31 IST