शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेंच डावा कालवा फुटला : लाखो लिटर पाणी गेले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 20:58 IST

पेंच जलाशयाचा डावा कालवा सोमवारी सकाळी ६ वाजता फुटला. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे लाखो लिटर पाणी वाया गेले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गुंढरी (पंडे) गावाजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर (पारशिवनी) : पेंच जलाशयाचा डावा कालवा सोमवारी सकाळी ६ वाजता फुटला. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे लाखो लिटर पाणी वाया गेले.पेंच जलाशयाच्या कालव्याला ठिकठिकाणी लहान मोठे सिपेज आहेत. याकडे पेंच पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. अशातच सोमवारी सकाळी ६ वाजता पेंचपासून ६ कि.मी. अंतरावर गुंढरी (पंडे) गावाजवळ कालव्याला भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाहून गेले. स्थानिक शेतकरी अविनाश सांगोडे यांनी ही माहिती संबंधित विभागाच्या सर्वेअरला कळविली. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने भगदाडामुळे कालव्याच्या सरक्षक भिंतीला तडा गेल्या. पाटबंधारे विभागाने सकाळी ९ वाजता कालवा बंद केला. त्यामुळे पाण्याचा वेग कमी झाला. तोवर सिंचनाचे लाखो लिटर पाणी वाया गेले. कालव्याच्या शेजारी मोतीलाल सांगोडे यांची शेती होती. यात धानाचे पीक होते. ते पाण्यामुळे वाहून गेले. यात सांगोडे यांचे मोठे नुकसान झाले.कालवा दुरुस्तीकडे दुर्लक्षपेंचच्या डाव्या कालव्याची अवस्था बिकट आहे. ठिकठिकाणी पॅचेसला भेगा पडल्या आहेत. तीन वर्षापूर्वी कालव्याच्या दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्यात आले. परंतु ही दुरुस्ती कामचलावू स्वरुपाची करण्यात आली.दरवर्षी मेंटनन्सच्या नावावर लाखो रुपये खर्च होतो, तरी कालवा फुटण्याच्या घटना कमी झालेल्या नाही. त्यामुळे मेंटनन्स नेमका कशाचा होतो आहे, हा संशोधनाचा विषय आहे.पेंचच्या डाव्या आणि उजव्या कालव्याची अवस्था वाईट आहे. शासन शेतकऱ्यांकडून शेतीचा वायदा वसूल करते. मात्र शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.अ‍ॅड.आशिष जयस्वालअध्यक्ष, राज्य खनिकर्म महामंडळ

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर