शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

१ जुलैपासून पेंच, बोर, उमरेड–करांडला मुख्य सफारी बंद!

By शुभांगी काळमेघ | Updated: June 25, 2025 17:56 IST

मुख्य दरवाजे बंद, बफर झोन खुला : पावसात सफारीचं नवीन शेड्युल

नागपूर : राज्यात पावसाळ्याला सुरुवात होताच वन विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वन्य प्राण्यांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच पावसाळा वन्यजीव प्रजनन कालावधी असल्याने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १ जुलै २०२५ पासून पेंच, बोर व उमरेड–पौनी–करांडला अभयारण्यातील मुख्य जंगल सफारी पूर्णपणे बंद राहणार आहे. हा निर्णय पुढील सूचना निघेपर्यंत लागू असेल. सिलारी, खुर्सापार, करांडला आणि गोठंगाव हे मुख्य प्रवेशद्वार या कालावधीत बंद असतील. या दरम्यान या क्षेत्रांमध्ये कोणतीही सफारी होणार नाही.

बफर झोनमध्ये सफारीला परवानगीमुख्य क्षेत्र बंद असले तरी बफर झोनमधील सफारी सुरू राहणार आहे. पेंचच्या बफरमध्ये अनेक पर्यटक जंगलातील हिरवळ, पक्षी निरीक्षण आणि वन्य प्राण्यांचा अनुभव घेण्यासाठी आकर्षित होतात. 

बुकिंगची प्रक्रिया

  • बफर झोनमध्ये सफारीसाठी ऑनलाइन बुकिंग उपलब्ध नाही.
  • सर्व बुकिंग स्थानिक गेटवर प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑफलाइन पद्धतीने करावे लागेल.
  • पावसामुळे रस्त्यांची स्थिती खराब असल्यास सफारी रद्द होण्याची शक्यता राहते.

पर्यटकांसाठी सूचना

  • पावसाळी तयारी करून यावे (रेनकोट, छत्री, चांगली पावसाळी चप्पल)
  • कीटक प्रतिबंधक औषधे, टॉर्च आणि आवश्यक औषधे बरोबर ठेवावीत
  • सफारी दरम्यान वनविभागाच्या नियमांचे पालन करावे

 

टॅग्स :Tigerवाघbhor-acभोरnagpurनागपूर