शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

खोटे आरोप केल्यामुळे विद्यार्थिनीला हायकोर्टात दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर खोटे आरोप केल्यामुळे एका विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एक हजार रूपये दंड ठोठावून दणका दिला. तसेच, दुसऱ्या बाजूने अंतर्गत परीक्षेची विनंती मान्य करून त्या विद्यार्थिनीला दिलासाही दिला. संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ठळक मुद्देअंतर्गत परीक्षेत दिलासा दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजश्री वैष्णव यांच्यावर खोटे आरोप केल्यामुळे एका विद्यार्थिनीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी एक हजार रूपये दंड ठोठावून दणका दिला. तसेच, दुसऱ्या बाजूने अंतर्गत परीक्षेची विनंती मान्य करून त्या विद्यार्थिनीला दिलासाही दिला. संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.प्रीती फडके असे विद्यार्थिनीचे नाव आहे. पदव्युत्तर शिक्षणशास्त्राच्या अंतर्गत परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आल्यामुळे तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून डॉ. वैष्णव यांनी पूर्वग्रहदूषित भावनेतून मूल्यमापन केले असा आरोप केला होता. विद्यापीठ व डॉ. वैष्णव यांनी तिचे आरोप पुराव्यानिशी निरर्थक ठरवले. परिणामी, न्यायालयाने तिला सर्व आरोप मागे घेण्याची संधी दिली. त्यानंतर तिने सर्व आरोप मागे घेतले. परिणामी, न्यायालयाने याचिकेवर पुढील कार्यवाही केली व दोन महिन्यात याचिकाकर्तीची अंतर्गत परीक्षा घेऊन निकाल जाहीर करण्यास सांगितले. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील तर, वैष्णव यांच्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थी