शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 20:09 IST

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी अश्या एकूण १३ वरिष्ठांना त्यांच्या दैंनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांचेकडून मार्च २०१८ या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम दंड स्वरूपात वसुल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देबिलींगकडे दुर्लक्ष : थकबाकीचे वाढते प्रमाण भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी अश्या एकूण १३ वरिष्ठांना त्यांच्या दैंनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांचेकडून मार्च २०१८ या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम दंड स्वरूपात वसुल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत.पाच हजारापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांच्या यादीतील ग्राहकांकडून विहीत मुदतीत थकबाकी भरुण घेणे अथवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता यांना देण्यात आल्या होत्या, या सुचनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या तीन कार्यकारी अभियंत्यांसह महावितरणच्या वित्त व लेखा विभागात कार्यरत दहा व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक यांचेवरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून त्यांच्या दैंनंदिन कामांत प्रामुख्याने समावेश असलेल्या वीज ग्राहकांकडील सामान्य बिलींग, नादुरुस्त मिटरचे बिलींग, सरासरी बिलींग याकडे दुर्लक्ष सोबतच वसुली कार्यक्षमता कमी होऊन थकबाकीच्या प्रमाणात वाढ होणे, याशिवाय मीटर रिडींग एजन्सीच्या चुकांकडे डोळेझाक करणे, चुकीचे मीटर वाचन करणाऱ्या एजन्सीविरोधात किंवा एजन्सीच्या संबंधीत मीटर वाचकावर कार्यवाही करण्याचे टाळणे आदी अनियमिततेचा ठपका ठेवित या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती.यापैकी ३ कार्यकारी अभियंते आणि वित्त व लेखा विभागातील दहा अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक आढळल्याने त्यांचेवर शिस्तभंग कार्यवाहीच्या अनुषंगाने त्यांच्या मार्च २०१८ या महिन्याच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम दंड स्वरूपात वसुल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी निगर्मित केले आहेत. दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये पुसद, बुलढाणा, वाशिम, अकोला, पांढरकवडा, वर्धा, अचलपूर, खामगाव, आलापल्ली, नागपूर ग्रामिण, मौदा आणि हिंगणघाट या कार्यालयांतर्गत असलेल्या कार्यकारी अभियंता आणि वित्त व लेखा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय अश्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये अशी सक्त ताकीद तीन अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर