शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

पादचाऱ्याला दुचाकीने उडविले

By admin | Updated: November 15, 2015 02:16 IST

भरधाव मोटरसायकलने पायी जाणाऱ्यास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

बाजारगावजवळ अपघात : कोंढाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलनागपूर : भरधाव मोटरसायकलने पायी जाणाऱ्यास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात ७ नोव्हेंबरला रात्री ९.२० वाजताच्या सुमारास कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव येथे झाला. राजू नत्थू वानखेडे (४०, रा. वरुड) असे मृताचे नाव आहे. राजू हे नागपूर-अमरावती मार्गाने पायी जात होते. दरम्यान एमएच-३१/४०४२ क्रमांकाच्या मोटरसायकलने त्यांना जबर धडक दिली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना लगेच मेडिकलमध्ये भरती केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार सुधाकर लोहकरे करीत आहे. शेतातून मोटरपंप पळविलाओलित करण्यासाठी शेतात लावलेला इलेक्ट्रिक मोटरपंप चोरट्याने पळविला. ही घटना सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसरनाला शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. महादेव नत्थू बनकर (५०, रा. तेलकामठी) असे फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी त्यांच्या शेतात ओलित करण्यासाठी विहिरीवर मोटरपंप लावला होता. दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्याने तो पळविला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पवनीत घरफोडीघरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने रोख रकमेसह एकूण ६९ हजारांचा ऐवज चोरून नेला. घरफोडीची ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदामानगरी, पवनी येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. यासीम कालेखाँ पठाण (४५, रा. सुदामानगरी, पवनी) असे फिर्यादीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी ते आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान चोरट्याने संधी साधत कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ४९ हजारांचे दागिने आणि रोख २० हजार रुपये असा एकूण ६९ हजारांचा ऐवज घेऊन चोरट्याने पळ काढला. ही बाब लक्षात येताच यासीम यांनी देवलापार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून गुन्हा दाखल केला. जळालेल्या महिलेचा मृत्यूचुलीतील काड्या पेटवत असताना जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठोंबरा येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गीता जागेश्वर रंगारी (३७, रा. ठोंबरा, ता. उमरेड) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला तिच्या घरी चुलीत काड्या पेटविण्याचा प्रयत्न करीत होती. काड्या पेटत नसल्याने तिने त्यावर रॉकेल ओतले. या रॉकेलचा भडका उडाल्याने तिच्या कपड्यांनी पेट घेतला. यात गंभीररीत्या भाजल्याने तिला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)