शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध तत्त्वज्ञानातच प्रगतीचे शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 11:51 IST

तथागत बुद्धाच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.

ठळक मुद्देभदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा धम्मसंदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवस्थेसोबत चालत आलेली दृष्टी व जीवनशैली नाकारून नव्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करण्याची आज गरज आहे. हाच तथागत बुद्धाने सांगितलेला जीवनमार्ग आहे. त्यांच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.इंदोरा बुद्ध विहार येथे जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा धम्मसंदेश बौद्ध अनुयायांना दिला आहे. कोंडीत सापडलेल्या श्वासांना मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा व जगभरात प्रेरणा निर्माण करा. माणूस कितीही मोठा बुद्धिवंत असला आणि इतरांचा द्वेष करीत असला तरी तो उजेडात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. म्हणून कुणाचाही द्वेष करू नका, प्रेम करा व प्रेमाची फुले निर्माण करा; कारण जगाला आज बुद्धाच्या शांतता, करुणा व प्रज्ञेची खरी गरज आहे.आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय मिळविणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा विजय होईल व तो तुमच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. वाईटाने वाईटावर मात करता येऊ शकत नाही.तिरस्कार केवळ प्रेमानेच संपविला जाऊ शकतो, असे विचार त्यांनी दिले. आयुष्यात हिंसाचाराला स्थान नको. नेहमी रागात राहणे म्हणजे जळलेला कोळसा दुसऱ्यावर फेकण्यासाठी स्वत:च्या हातात ठेवण्यासमान आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो. तुम्ही चांग

ल्या पुस्तकांचे वाचन करता, त्यातील विचार आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हजारो पोकळ शब्दांपेक्षा एक चांगला शब्द महत्त्वाचा आहे.जग सध्या संकुचनाच्या मार्गावर चालत आहे. यामुळे विश्वावर युद्धाचे ढग जमा होत आहेत. पण जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, असा संदेश देत भदंत सुरई ससाई यांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या विचाराने स्वत:च्या अंतरंगातील दीप चेतविण्याचे आवाहन या धम्मसंदेशात केले.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा