शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

नागपुरात शांतता कायम, नंदनवन-कपिलनगरमध्ये कर्फ्यू हटला

By योगेश पांडे | Updated: March 20, 2025 15:37 IST

कोतवाली, तहसील, गणेशपेठमधील कर्फ्यू ‘जैसे थे’ : उर्वरित सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार शिथिलता

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य नागपुरातील महाल-हंसापुरीत पसरलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी शहरातील अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावला होता. मात्र गुरुवारी पोलिसांनी नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू हटविला तर सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथिलता दिली आहे. मात्र कोतवाली, तहसील व गणेशपेठ या तीनही पोलीस ठाण्यातील कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी हे निर्देश जारी केलेत.

सोमवारी रात्री भालदापुरा, चिटणीस पार्क, हंसापुरी या भागात जाळपोळ व हिंसाचार झाला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली होती. यातील बहुतांश भाग हे बाजारपेठांचे भाग म्हणून ओळखले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनादेखील अडचण होत होती. मागील तीन दिवसांपासून शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे गुरुवारी स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू पूर्णत: हटविण्यात आला. तर परिमंडळ तीनमधील लकडगंज, पाचपावली, शांतीनगर तर परिमंडळ चारमधील सक्करदरा, इमामवाडा व परिमंडळ पाचमधील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्फ्यूमध्ये शिथिलता आणण्यात आली. दुपारी दोन ते चार या कालावधीत लोक बाहेर पडू शकतात आणि या वेळेत दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी होऊ शकते असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. टप्प्याटप्प्यात पुढील शिथिलता आणण्यात येणार आहे. मात्र इतवारी, महाल यासारखी प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतवाली, तहसील व गणेशपेठ पोलीस ठाण्यांतील नागरिकांना मात्र दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे हा आठवडा कर्फ्यूतच जाण्याची चिन्हे असून कोट्यवधींचे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस