शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेडिकलमधील पीसीआर लॅब चंद्रपूरला स्थानांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 19:46 IST

इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)ने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी हा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, अशी विचारणा करून यासंदर्भात दोन आठवड्यांत समाधानकारक स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश राज्य शासनाला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती : शासनाला मागितले स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर)ने नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील गर्भजल तपासणी प्रयोगशाळा (पीसीआर लॅब) चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी हा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, अशी विचारणा करून यासंदर्भात दोन आठवड्यांत समाधानकारक स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश राज्य शासनाला दिला.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सिकलसेल आजाराचे अस्तित्व असलेल्या कुटुंबात जन्मणाऱ्या बाळाला सिकलसेल आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी गर्भजल तपासणी केली जाते. त्या तपासणीत बाळाला सिकलसेल आजार आढळून आल्यास पुढील आवश्यक निर्णय घेणे शक्य होते. विदर्भातील सिकलसेल रुग्णांच्या सुविधेसाठी २००६ मध्ये मेयो व मेडिकल रुग्णालयांत गर्भजल तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या होत्या. परंतु, आवश्यक तज्ज्ञ व कर्मचारी नसल्यामुळे दोन्ही प्रयोगशाळांचा आतापर्यंत उपयोग होऊ शकला नाही. न्यायालयाच्या दणक्यानंतर शासनाने या महिन्यात मेयोमधील नवीन इमारतीत प्रयोगशाळा कार्यान्वित केली आहे. मेडिकलमधील प्रयोगशाळाही कार्यान्वित करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. परंतु, आता ही प्रयोगशाळा चंद्रपूर येथे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जेनेटिस्टचे पद रिक्तमेयोमधील पीसीआर लॅबमध्ये जेनेटिस्टचे पद रिक्त असल्यामुळे गर्भजल तपासणी अहवालावर स्वाक्षऱ्या  करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. कायद्यानुसार पीसीआर लॅबमध्ये दोन वर्षांचा अनुभव असणाऱ्या जेनेटिस्टची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय गर्भजल तपासणी अहवाल अंतिम समजला जाऊ शकत नाही. परिणामी, न्यायालयाने शासनाला कायम जेनेटिस्टची नियुक्ती कधी करता व तेव्हापर्यंत काय पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी विचारणा करून यावरही स्पष्टीकरण मागितले.समन्वय समिती नाहीया प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी शासनाने सिकलसेलशी संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी अद्याप समिती स्थापन केली नाही व यासंदर्भात न्यायालयाने २०१५ मध्ये आदेश दिला होता, असे सुनावणीदरम्यान सांगितले. ही बाब लक्षात घेता, उच्च न्यायालयाने शासनाला समन्वय समिती कधीपर्यंत स्थापन करता, यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयHealthआरोग्य