शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना ३८.७० लाख रुपये अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:00 IST

आयडिया सेल्युलर कंपनी व इतर संबंधितांच्या चुकीमुळे अज्ञात आरोपींनी आॅनलाईन व्यवहाराद्वारे दोन ग्राहकांच्या बँक खात्यांतून ३८ लाख ७० हजार रुपये लंपास केले. ती रक्कम ग्राहकांना परत करण्यात यावी, असा आदेश माहिती व तंत्रज्ञान सचिवांनी कंपनी व इतरांना दिला आहे.

ठळक मुद्देआयटी सचिवांचा आदेश : आयडिया सेल्युलर कंपनीला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयडिया सेल्युलर कंपनी व इतर संबंधितांच्या चुकीमुळे अज्ञात आरोपींनी आॅनलाईन व्यवहाराद्वारे दोन ग्राहकांच्या बँक खात्यांतून ३८ लाख ७० हजार रुपये लंपास केले. ती रक्कम ग्राहकांना परत करण्यात यावी, असा आदेश माहिती व तंत्रज्ञान सचिवांनी कंपनी व इतरांना दिला आहे.राजकुमार सिंघी व नंदकिशोर गवारकर अशी ग्राहकांची नावे आहेत. त्यांचे वकील अ‍ॅड. महेंद्र लिमये यांनी मंगळवारी पत्रकारांना या प्रकरणाची माहिती दिली. हे दोन्ही ग्राहक आयडिया कंपनीचे सीम कार्ड वापरत होते. अज्ञात आरोपींनी हे ग्राहक वापरत असलेल्या क्रमांकाचे बनावट कागदपत्रांद्वारे दुसरे सीम कार्ड मिळविले. आरोपींना दुसरे सीम कार्ड देताना कंपनीने आवश्यक पडताळणी केली नाही. त्यानंतर ४ जुलै २०१६ रोजी आरोपींनी सिंघी यांच्या सारस्वत बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व पंजाब नॅशनल बँकेतील बचत खात्यातून २६ लाख ७० हजार रुपये काढून घेतले. तसेच, गवारकर यांच्या सारस्वत बँकेतील खात्यातून १२ लाख रुपये चोरले. ही रक्कम कोलकाता येथील आयएनजी वैश्य बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, एचडीएफसी बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया इत्यादी बँकांतील खात्यात वळती करण्यात आली होती. त्यानंतर ती रक्कम काढून घेण्यात आली. दोन्ही ग्राहकांनी सुरुवातीला याची पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर भरपाई मिळण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान सचिवांकडे अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज मंजूर झाला.

टॅग्स :IdeaआयडियाITमाहिती तंत्रज्ञान