शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पर्यावरणाकडे लक्ष द्या

By admin | Updated: November 12, 2014 00:58 IST

नागपुरातील नाग नदीला पुनरुज्जीवित करून विदर्भातील पर्यावरणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ एन्व्हायरमेंटल अ‍ॅक्शन ग्रुपने केली आहे.

‘व्हीईएजी’ची मागणी : मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावानागपूर : नागपुरातील नाग नदीला पुनरुज्जीवित करून विदर्भातील पर्यावरणाच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विदर्भ एन्व्हायरमेंटल अ‍ॅक्शन ग्रुपने केली आहे.पर्यावरणाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा चर्चा करण्यात आली. ‘व्हीईएजी’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात बैठकीतील मुद्दे मांडण्याचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री याकडे तातडीने लक्ष देऊन ते सोडवतील, अशी अपेक्षा संघटनेचे संयोजक सुधीर पालीवाल यांनी व्यक्त केली आहे. नाग नदी आणि अंबाझरी तलावाचे संवर्धन व पुनरुज्जीवन करणे महत्त्वाचे आहे. नाग नदी शुद्धीकरणाच्या योजनेची सुरुवात फडणवीस महापौर असताना झाली होती. केंद्राकडून मदत घेऊन नाग नदीचा कायापालट केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल. अंबाझरी तलावाचे अस्तित्व धोक्यात आहे. नाग नदी डिनोटिफाईड झाल्यास तलावाच्या परिसरातील बांधकाम संपुष्टात येऊ शकते, असेही पालीवाल यांनी स्पष्ट केले आहे. कोराडी येथे १९८० मेगावॅट वीज प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी वाढण्याचा धोका आहे. वीज प्रकल्पाचा विस्तार शहरशेजारी करण्यात आला आहे. पर्यावरण व वन मंत्रालयाच्या अनेक शिफारशी या प्रकल्पाने धुडकावून लावल्या आहेत. फ्लाय गॅस डिसल्फरायझेशन लावणे आवश्यक असताना त्याचे पालन करण्यात आलेले नाही. दूषित पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था नाही, याकडेही पालीवाल यांनी लक्ष वेधले आहे. विदर्भाच्या विविध भागात मोठे वीज प्रकल्प उभारण्याला आमचा ठाम विरोध आहे. भंडाऱ्यात ओलिताखालील शेतजमिनीवर उभारण्यात येणारा वीज प्रकल्प थांबवण्यात यावा. शेतकऱ्यांची परवानगी न घेताच शेतातून वीज प्रवाहाचे टॉवर उभारणे ही या भागातील आणखी एक समस्या आहे.वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्सचा शोध घेऊन त्याचे रक्षण करण्यासाठी ठोस धोरण जाहीर करावे. पायाभूत सोयींच्या नावाखाली वाईल्ड लाइफ कॉरिडॉर्स उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हायवेवरील मोठे वृक्ष अन्य ठिकाणी जगतील याची काळजी घेण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सर्व प्रश्न माहीत असल्याने या सर्व मुद्यांवर ठोस धोरण जाहीर करतील, असा विश्वास पालीवाल यांनी व्यक्त केला आहे. बैठकीत अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू कमल सिंग, परमजित आहुजा, आशिष डगवार,आकाश मिश्रा, डॉ. नईम खान, संगीता मिश्रा यांनीही विविध मुद्दे उपस्थित केले. (प्रतिनिधी)