शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाघाताच्या रुग्णांचा आता दिव्यांगाच्या श्रेणीत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:15 IST

केंद्राने २०१६ च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली आहे. ९ वरून २१ प्रवर्ग केले आहेत. यात पक्षाघातापासून ते कंपवात रोगाचा समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे९ वरून केले २१ प्रवर्गकुष्ठरोग, सिकलसेल, थॅलेसेमिया, कंपवात रोगाचाही समावेशजागतिक अपंग दिन

आॅनलाईन लोकमतनागपूर : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने बरेच प्रयत्न होत असले तरी आजही राज्यात केवळ नऊ दिव्यांग प्रवर्गात येणाऱ्यांनाच अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे. यामुळे मोजक्याच दिव्यांगाना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे, केंद्राने २०१६ च्या नव्या कायद्यानुसार दिव्यांगांच्या प्रवर्गात वाढ केली आहे. ९ वरून २१ प्रवर्ग केले आहेत. यात पक्षाघातापासून ते कंपवात रोगाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी राज्यात झाली नसल्याने हजारो दिव्यांग बांधव आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत अपंग पुनर्वसन केंद्राने अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र शून्य टक्के करण्याचा उद्देश ठेवून त्याचे योग्य पद्धतीने नियोजन केल्याने हजारो दिव्यांग बांधवाना प्रमाणपत्र मिळू शकले. परंतु जे दिव्यांग असूनही प्रवर्गात येत नाही ते वंचित राहिले आहे. त्यांच्यासाठी केंद्राचा हा नवीन कायदा लाभदायी ठरणारा आहे. यात ‘अध्ययन अक्षम’ म्हणजे ज्याला वाचन, लेखन करण्यास अवघड जात असेल, उलटे अक्षर लिहित असेल त्याचाही समावेश दिव्यांगांच्या प्रवर्गात केला आहे. या सोबतच मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बुटकेपणा, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, हातापायातील स्नायूंमधील ताठरपणा किंवा कमजोरी म्हणजे ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’, थॅलेसिमीया, अनुवांशिक रक्तविकार, सिकलसेल, अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेले रुग्ण, कंपवात रोग यांचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु हा कायदा अद्यापही राज्यात लागू झालेला नाही. तो व्हावा यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे. प्रवर्ग वाढल्यास दिव्यांगाना फायदापूर्वी दिव्यांगांसाठी केवळ ९ प्रवर्गांचा समावेश होता. केंद्राच्या नव्या कायद्यानुसार यात १२ प्रवर्गांची भर पडली आहे. यामुळे हा नवा कायदा दिव्यांगांसाठी फायद्याचा ठरणार आहे. राज्यात त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.-अभिजित राऊतसमन्वयक, अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र शिबिर

 

टॅग्स :nagpurनागपूर