शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण ओलीस प्रकरण : बहिणीच्या मृत्यूनंतरही दिली नाही सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:48 IST

पैशासाठी खासगी रुग्णालयाने सुरेश भरडभुंजे या ज्येष्ठ व्यक्तीला ओलीस ठेवले आहे. बहिणीचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांना सुटी दिली नाही. भरडभुंजे यांचा मुलगा व कुटुंब बुधवारपासून सुटी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मनपा अधिकाऱ्यांकडून त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पैशासाठी खासगी रुग्णालयाने सुरेश भरडभुंजे या ज्येष्ठ व्यक्तीला ओलीस ठेवले आहे. बहिणीचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांना सुटी दिली नाही. भरडभुंजे यांचा मुलगा व कुटुंब बुधवारपासून सुटी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मनपा अधिकाऱ्यांकडून त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.६२ वर्षीय भरडभुंजे हे १० ऑगस्ट रोजी बजाजनगर येथील एका खासगी रुग्णालयात भरती झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यामुळे ते १० दिवसांपासून रुग्णालयाला सुटी मागत होते. त्यांनी रुग्णालयाचे १.६५ लाख रुपये शुल्क भरले. परंतु रुग्णालयाने त्यांना आणखी १.६० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. हे प्रकरण पोलीस व मनपा अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले. भरडभुंजे यांनी अनेकदा पोलीस कंट्रोलला फोन करून समस्या सांगितली. बजाजनगर पोलिसांकडूनही काहीच मदत मिळाली नाही. मनपा आयुक्तांनाही तक्रार केली. पण कुठूनच मदत मिळत नसल्याने, लोकमतकडे त्यांनी तक्रार केली. लोकमतने हे प्रकरण उजेडात आणताच मनपा प्रशासन सतर्क झाले. त्यांनी चौकशी सुरू केली आहे. परंतु रुग्णालयाच्या दबावामुळे मनपा अधिकाऱ्यांनी कुठलीही ठोस कारवाई केली नाही. मनपा अधिकारी स्वत:ला संक्रमित असल्याचे सांगून कारवाईपासून हात झटकत आहेत.दरम्यान, बुधवारी सकाळी भरडभुंजे यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. तीसुद्धा कोरोना संक्रमित असल्याने कामठी रोडवरील एका खासगी रुग्णालयात भरती होती. भरडभुंजे यांनी मनपा अधिकारी व रुग्णालय प्रशासनाला सुटी देण्यास विनंती केली. त्यावर त्यांना ५० हजार रुपये तात्काळ जमा करण्यास सांगितले व उरलेले ५० हजार देण्यासाठी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यास सांगितले. भरडभुंजे त्यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे रुग्णालयाने त्यांना सुटी देण्यास मनाई केली. कोरोना संक्रमणामुळे लोक दहशतीत आहेत. गेल्या दोन दिवसात किमान १०० लोकांचा जीव गेला आहे. यात युवकांचाही समावेश आहे. अशात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची होत असलेली पिळवणूक आश्चर्यकारक आहे. भरडभुंजे यांचे कुटुंब दु:खात आहे. भरडभुंजे ज्या रुग्णालयात आहेत, तेथील अन्य रुग्णांनीही लोकमतला संपर्क साधून रुग्णालयाकडून वसुली जोरात सुरू असल्याची तक्रार केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, डॉक्टरांचे संघटनसुद्धा रुग्णांची व्यथा ऐकून घेण्यास तयार नाही. यासंदर्भात मनपाचे अप्पर आयुक्त जलज शर्मा यांनी सांगितले की प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात तथ्य आढळल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर