शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १०७ दिवसांनंतर व्हेंटिलेटरवरून रुग्ण बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 08:21 IST

तब्बल १०७ दिवसांनंतर व्हेंटिलेटरवरून रुग्ण बाहेर

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सुनीलला (बदलेले नाव) मिरगीचा आजार आहे. लहानपणीच पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्यासह दोन मुलांची जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध चाचण्यांच्या अहवालावरून अखेर १५ वर्षीय युवकाला  ‘टिव्हन्स जॉन्सन सिन्ड्रोम्स’ या दुर्मीळ आजाराचे निदान झाले. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. रुग्णानेही उपचाराला प्रतिसाद दिला. यामुळे तब्बल १०७ दिवसांनी रुग्ण व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. ही घटना खासगी रुग्णालयातील नव्हे, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) आहे. मृत्यूच्या दाढेतून मुलाला बाहेर काढल्याने मुलाच्या आईने सर्व डॉक्टरांचे आभार मानले.

गडचिरोली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सुनीलला (बदलेले नाव) मिरगीचा आजार आहे. लहानपणीच पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्यासह दोन मुलांची जबाबदारी आईच्या खांद्यावर आली. 

खासगी काम करून ती घर चालवायची. २४ जुलै २०२१ रोजी अचानक सुनीलची प्रकृती खालावली. त्याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याचा ताप वाढण्यासोबतच संपूर्ण अंगावर व आंतर अवयवांवरही फोड आले. यामुळे डॉक्टरांनी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात भरती केले. उपचाराला सुरुवात झाली. तपासणीतून त्याला ‘टिव्हन्स जॉन्सन सिन्ड्रोम्स’ हा दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले. त्याला श्वासही घेता येत नव्हता. यामुळे त्यााल त्वरित व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्याने अँटिबायोटिक औषधांनाही तो प्रतिसाद देत नव्हता. परिणामी डॉक्टरांनी मल्टिपल अँटिबायोटिक देणे सुरू केले. हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. १०७ दिवसांनंतर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढले. नुकतेच त्याला सामान्य वॉर्डात हलविण्यात आले आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून सुटी मिळणार आहे.

आजाराची गुंतागुंत वाढली होतीसुनीलचा आजार इतका पसरला होता की, त्याला श्वास घेणेही कठीण झाले होते. फुप्फुसावर सूज येऊन त्यामध्ये रक्तातील पाणी जमा होऊ लागले होते. त्याचा रक्तदाब कमी होण्यासोबतच किडनीवर त्याचा प्रभाव पडला होता. मेंदूच्या नसांमध्येही रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. गुंतागुंत वाढली होती. व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नामुळे त्याची प्रकृती स्थिर झाली.     -डॉ. मिलिंद व्यवहारे,     प्रमुख आयसीयू, मेडिसिन विभाग, मेडिकल

 

 

टॅग्स :nagpurनागपूरhospitalहॉस्पिटल