शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात, ३५०० ते ५००० कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:37 IST

पतंजली आयुर्वेद लिमिटेड नागपूरच्या मिहान-सेझमध्ये जगातील सर्वात मोठा संत्रा-प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. ३५०० ते ५००० कोटींची गुंतवणूक असलेला हा स्वयंचलित प्रकल्प २०१८ मध्ये उत्पादन सुरू करेल, अशी माहिती पतंजली आयुर्वेदचे प्रबंध संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : पतंजली आयुर्वेद लिमिटेड नागपूरच्या मिहान-सेझमध्ये जगातील सर्वात मोठा संत्रा-प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. ३५०० ते ५००० कोटींची गुंतवणूक असलेला हा स्वयंचलित प्रकल्प २०१८ मध्ये उत्पादन सुरू करेल, अशी माहिती पतंजली आयुर्वेदचे प्रबंध संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. नागपुरात १६ ते १८ डिसेंबरदरम्यान आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या पार्श्वभूमीवर आचार्य बालकृष्ण यांनी केलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत आचार्य बालकृष्ण म्हणाले की, दोन वर्षापूर्वी शेतकरी आत्महत्येच्या बातम्यांमुळे व्यथित होऊन योगगुरू बाबा रामदेव यांनी आमचे लक्ष विदर्भाकडे वेधले. आम्ही नंतर इथल्या पिकांचा, जमिनीचा व शेती पद्धतीचा व विशेष नागपूरचा सखोल अभ्यास करुन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. या संत्रा-प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता दर दिवशी ८०० टन (४० ट्रक) राहील. या प्रकल्पात संत्र्याचा ज्यूस तर तयार होईलच पण सालीपासून तेल काढले जाईल व उरलेल्या चोथ्याचाही सुयोग्य उपयोग केला जाईल. याचबरोबर दररोज ६०० टन क्षमता असलेला खाद्यान्न-प्रक्रिया प्रकल्पही मिहान-सेझमध्ये आणत आहोत. यात आवळा, टमाटे, अ‍ॅलोव्हेरा (कोरफड) व इतर फळवर प्रक्रिया करून पॉवर विटा, ग्लुकोज, नूडल्स, ब्रेड, बिस्कीट इत्यादी उत्पादनांचे कारखाने राहतील. या दोन्ही प्रकल्पांमध्ये जागतिक गुणवत्ता मानकाचे उदा. यूएसएफडीए, युरोपियन युनियनची मानके यांचे काटेकोर पालन करून उत्पादने निर्यातही केली जातील.पतंजलीचे बिझनेस मॉडेलपतंजलीच्या व्यवसाय पद्धतीबद्दल बोलताना आम्ही ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’ करतो, असे सांगून शेतकºयांना जास्त मोबदला आणि ग्राहकांसाठी स्वस्त किंमत हे आमचे ध्येय आहे, असे आचार्य बालकृष्ण म्हणाले. आम्ही शेतकºयांकडून थेट कच्चा माल विकत घेतो त्यामुळे त्यांनी अधिक मोबदला मिळतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मोठ्या क्षमतेने उत्पादन घतो, त्यामुळे साहजिकच उत्पादन खर्च आटोक्यात ठेवतो त्यामुळे ग्राहकांना उत्पादने स्वस्त किमतीत मिळतात. दर्जेदार कच्चा माल मिळावा म्हणून आम्ही शेतकºयांना बी-बियाण्यांसोबत तंत्रज्ञान देतो व उत्पादनांच्या पॅकिंगपर्यंत सर्व प्रक्रिया पतंजलीच्या एकाच छत्राखाली उभ्या करतो त्यामुळे शेतकरी व ग्राहक दोघांचाही फायदा होतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.दरवर्षी पतंजलीची उलाढाल दुप्पट होण्याचे रहस्य काय, यावर यावर्षी आमचे काही प्रकल्प लांबल्यामुळे यावर्षी आम्ही तसे करू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. २०१५-१६ मध्ये पतंजलीची उलाढाल ५००० कोटी होती ती २०१६-१७ मध्ये १०५६१ कोटी झाली पण २०१७-१८ मध्ये ती २०,००० कोटीपेक्षा जरा कमीच राहील असे आचार्य बालकृष्ण म्हणाले. नागपूरसोबतच आसाममध्ये पतंजली आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनांचा १५०० कोटींचा प्रकल्प उभा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.आचार्य बालकृष्ण देशातील आठवे सर्वाधिक धनाढ्य व्यक्तीआचार्य बालकृष्ण यांची पतंजली आयुर्वेदमध्ये ९४ टक्के मालकी आहे तर उरलेले सहा टक्के मालकी हक्क योगगुरू बाबा रामदेव यांचेकडे आहे. आंतरराष्टÑीय संशोधन संस्था हरून इंडियाच्या धनाढ्य व्यक्तींच्या यादीत ७०,००० कोटी संपत्ती मूल्य असलेले आचार्य बालकृष्ण आठव्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या संपत्तीमूल्यात १७३ टक्क्यांची वाढ झाली. या यादीप्रमाणे मुकेश अंबानी सर्वात धनाढ्य व्यक्ती असून त्यांचे संपत्तीमूल्य २,५७,९०० कोटी आहे.

टॅग्स :nagpurनागपूर