शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत वाढली प्रचंड गर्दी, रिझर्वेशनसाठी धावपळ; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 16:57 IST

ऐन दिवाळीत अनेक रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांची कुचंबणा

नागपूर : दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची विविध रेल्वेमार्गावर मोठी गर्दी वाढत असताना विकासकामाच्या नावाने अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे संबंधित प्रवाशांची तीव्र कुचंबणा होत आहे. नियोजित ठिकाणी जाण्यासाठी दुसरा पर्याय शोधताना त्यांची मोठी धावपळ होत आहे.

मुंबई, पुणे, दिल्ली, लखनऊ, कानपूर, गोरखपूर, अलाहाबाद, हावडा आदी मार्गांवर धावणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. आता ही गर्दी दिवाळीमुळे आणखीच वाढणार आहे. अशात अनेक मार्गावरच्या विकास कामामुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी आधीच वेगवेगळ्या गाव, शहरांत जाण्याचे नियोजन केले, रिझर्वेशन करून ठेवले, त्यांची तीव्र कुचंबणा होत आहे. दुसरा पर्याय अथवा नव्याने दुसऱ्या मार्गाचे रिझर्वेशन करण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, रेल्वे बोर्डाचे चेअरमन, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पत्र वजा निवेदन लिहून प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधले आहे. त्यानुसार, अनेक रेल्वेगाड्यांचा वेळ बदलला आहे. त्यामुळे रेल्वेचा ‘ट्रेन ॲट ए ग्लांस’ टाईम टेबल तातडीने प्रकाशित करण्याची गरज आहे. रेल्वेगाड्यांच्या साफसफाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणीही शुक्ला यांनी केेली आहे.

...तर संपूर्ण रक्कम परत करावी !

चार तासांपेक्षा जास्त लेट झालेल्या ट्रेनचे तिकीट रद्द करत असेल तर त्या प्रवाशाला शंभर टक्के तिकिटाची रक्कम परत मिळावी. सणासुदीच्या दिवसांत रेल्वेगाड्यांत चोर भामट्यांची संख्या वाढते. त्यामुळे ट्रेनमध्ये टीटीई आणि आरपीएफच्या जवानांची संख्या वाढवावी, अशी मागणीही शुक्ला यांनी निवेदनातून केली आहे. सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये एक एसी-१ कोच जोडण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूरpassengerप्रवासी