शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यूपी, बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांचा जिवाची बाजी लावून प्रवास

By नरेश डोंगरे | Updated: April 5, 2024 14:27 IST

क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी : प्रचंड गर्दी, शाैचालयाजवळ बसून नाकतोंड दाबून प्रवास.

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवाशांची गर्दी होत असल्याने उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील स्थिती फारच वाईट झाली आहे. पर्याय नसल्याने प्रवासी या गाड्यांमध्ये जिवाची बाजी लावून प्रवास करीत आहेत. या संबंधिचा एक व्हीडीओ शुक्रवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे विकासाचा धडाका लावला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून रेल्वेचा प्रवास अधिक चांगला आणि गतीमान करण्याचे प्रयत्न केले जात आहे. रेल्वे गाड्यांमधील अनेक कोच वातानुकुलित करून प्रवास सुखद करण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, वातानुकुलित डब्यांची संख्या वाढविताना बहुतांश रेल्वेगाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या कमी झाल्याने गोरगरिब प्रवाशांची प्रचंड कोंडी झाली आहे. जनरल व्यतिरिक्त दुसऱ्या क्लासचा प्रवास परवडत नसल्याने हे बिचारे प्रवासी गावाला जाण्यासाठी रेल्वेच्या जनरल डब्यात स्वत:ला कोंबून घेत आहेत. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी डब्यात शिरत असल्याने बसणे तर सोडा पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. खास करून युपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील अवस्था फारच वाईट आहे. प्रवासी चक्क शाैचालयाजवळ बसून नाकतोंड दाबून प्रवासी करीत आहेत. यातीलच काही प्रवासी पर्यायच नसल्याने वातानुकुलित डब्यात शिरतात अन् नंतर आरक्षित आसनावर जबरदस्तीने बसून प्रवास करण्याचा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत त्यांचा वाद होतो.

गुरुवारी सायंकाळी सिकंदराबाद - दानापूर एक्सप्रेस नागपूर स्थानकावर आली. ती येथून सुटली तेव्हा खाली उतरून परत जिवाची बाजी लावून अनेक प्रवासी धावत्या गाडीत स्वत:ला कोंबून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते. हा व्हिडीओ गुरुवारी रात्रीपासून सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.काय करताहेत टीसी अन् गार्ड

विशेष म्हणजे, गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी टीसी आणि रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांची असते. आरक्षणाशिवाय त्या डब्यात प्रवाशांना शिरूच दिले जाऊ नये, ही त्यांची जबाबदारी असते. मात्र, ही मंडळी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.स्लिपर आणि जनरल डबे वाढविण्याची मागणी

व्हायरल व्हिडीओतून प्रवाशाच्या जिवाला कसा धोका आहे, त्याची कल्पना येऊ शकते. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे आज एकपत्र लिहून उपरोक्त प्रकाराची गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे. स्लिपर आणि जनरल डबे वाढविण्याची मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे