‘एसटी’ काढणार प्रवाशांचे ‘दिवाळे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:31 AM2017-09-19T00:31:49+5:302017-09-19T00:32:10+5:30

पूर्वी दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून भाडेवाढ केली जात असे.

Passengers' 'bust' | ‘एसटी’ काढणार प्रवाशांचे ‘दिवाळे’

‘एसटी’ काढणार प्रवाशांचे ‘दिवाळे’

Next
ठळक मुद्देभाडेवाढीचा फटका : दिवाळीत मोजावे लागणार १० ते २० टक्के अधिक पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्वी दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून भाडेवाढ केली जात असे. परंतु आता खासगी ट्रॅव्हल्स पाठोपाठ एसटी महामंडळानेही आपल्या धोरणात बदल करून दिवाळीच्या काळात १० ते २० टक्के भाडेवाढ केल्यामुळे विदर्भातील हजारो प्रवाशांना या दरवाढीचा भुर्दंड बसणार आहे.
एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ राहत असल्यामुळे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून १४ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान साध्या एसटी बसमध्ये प्रवास केल्यास १० टक्के, निम आराम बसने प्रवास करणाºया प्रवाशांना १५ टक्के आणि वातानुकूलित बसने प्रवास करणाºया प्रवाशांच्या तिकिटात २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या निर्णयाचा विदर्भातील हजारो प्रवाशांना फटका बसणार आहे. पूर्वी दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून तिप्पट ते चौपट भाडेवाढ करून प्रवाशांची लूट करण्यात येत होती. परंतु या काळात एसटी महामंडळाकडून अद्यापपर्यंत भाढेवाढ करण्यात आली नव्हती. आता एसटी महामंडळानेही उत्पन्न वाढीसाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या धर्तीवर घेतलेला भाडेवाढीचा निर्णय प्रवाशांना आर्थिक संकटात टाकणारा ठरणार आहे.
खासगी ट्रॅव्हल्सकडूनही होणार लूट
दिवाळीच्या काळात नागपूर-पुणे-नागपूर असा प्रवास करणाºया विदर्भातील विद्यार्थी, नोकरदारांची संख्या फार मोठी आहे. नेमका याच बाबीचा फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक एरवी १००० ते १२०० रुपये असलेल्या तिकिटाचे दर वाढवून तीन हजार रुपये करतात. नाईलाजास्तव प्रवाशांना अधिकची रक्कम मोजून प्रवास करण्याची पाळी येते. आता एसटी महामंडळानेही भाडेवाढ केल्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांकडून आणखी प्रवाशांची लूट होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Passengers' 'bust'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.