शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्वा लाईनवर आता दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 00:12 IST

अ‍ॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.

ठळक मुद्देमेट्रो फेऱ्यामध्ये आजपासून वाढ : ऑरेंज व अ‍ॅक्वा लाईनवर २०० फेऱ्या

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अ‍ॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.यापूर्वी केवळ ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू होती. आता अ‍ॅक्वा लाईनवरदेखील सीताबर्डी स्टेशन येथून सकाळी ८ ते सायंकाळी ८.३० पर्यंत लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन येथून मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व नियोजन महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे. अ‍ॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन मिळून दररोज २०० मेट्रोच्या प्रवासी फेऱ्या होणार आहे.अ‍ॅक्वा लाईन या ११.५ किमी लांबीच्या मार्गिकेवर सहा मेट्रो स्टेशन लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांशी राणी आणि सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या मार्गिकेवर प्रवासी दरही कमी आहे. या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात असलेल्या शैक्षणिक संस्था असून विद्यार्थ्यांसाठी मेट्रो सेवा अतिशय फायद्याची ठरत आहे. शिवाय या भागातील औद्योगिक वसाहती अंतर्गत असलेल्या अनेक छोट्यामोठ्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी मेट्रो सेवा फायद्याची ठरणार आहे. शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा फायदा होत आहे. या मार्गावर अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर