शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

नागपुरात निर्माणाधीन पुलाचा एक भाग कोसळला; जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 23:23 IST

Nagpur News कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास कोसळला.

नागपूर: कळमना मार्केटकडे जाणा ऱ्या मार्गावर असलेल्या भारतनगर चौकात निर्माणाधीन असलेल्या पुलाचा एक भाग मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या पुलाचा एक भाग पडण्याआधी तेथून एक चारचाकी गाडी गेली होती. या गाडीत अख्खे कुटुंब होते. अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने या कुटुंबियांचे प्राण वाचल्याची चर्चा येथे होत होती. 

या पुलाच्या एका पिल्लरवर स्पॅन बेअरींग करण्यासाठी हाईड्रोलिक जॅकद्वारे उचलण्यात येत होते. याच दरम्यान जॅकहून स्पॅन घसरले. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास भरतनगर चौकाजवळ घडली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु नागरिकांनी रोष व्यक्त केला. पारडी ते कळमना दरम्यान हा उड्डाणपुल बनत आहे. नैवद्यम हिस्टोरियाच्या मागच्या भागात बनत असलेल्या पुलावर पी७ व पी८ स्पॅनला पिलरपासून काही उंच उचलून बेअरींगचे काम सुरू असताना ही घटना घडली. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी झाली. 

घटनेनंतर एनएचएआयचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल, प्रोजेक्ट डायरेक्टर एन.एल. येवतकर व आमदार कृष्णा खोपडे हे घटनास्थळी पोहचले. या पुलाच्या काही भागातील सळाखी गंजलेल्या सुद्धा आढलल्या. सर्व जॉईंट देखील उघडे पडले होते.  पारडी उड्डाणपुलाचे काम कित्येक वषार्पासून सुरू आहे. कामाची गती देखील मंद आहे.  सुत्रांच्या माहितीनुसार या घटनेमुळे बांधकामाशी संबंधित एका वरिष्ठ अधिका?्याला या प्रकल्पातून बाहेरचा रस्ता दाखविला जाणार आहे. या संदर्भात एनएचएआयचे प्रोजेक्ट डायरेक्टर एन.एल. येवतकर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की मी माहिती घेत आहे. अजूनही पूर्ण माहिती हाती आलेली नाही. 

- नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्ट होणार सुत्रांनी सांगितले की जॅकवरून स्पॅनवरून घसरलेल्या स्पॅनची मजबुती तपासण्यासाठी नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्ट होणार आहे. तपासात स्पॅन मजबूत निघाल्यास त्याला पुन्हा लावण्यात येईल. या कामाला किमान ७ दिवस लागू शकतात. कामठी रोडवर सुरू असलेल्या डबलडेकर पुलाचे स्पॅन एका वर्षापूर्वी  तुटले होते.

(A part of a bridge under construction in Nagpur collapsed)

टॅग्स :Accidentअपघात