व्हीटीएचे संचालकांना निवेदन : नागरिक अडचणीतनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीआयपीसाठी असलेल्या पार्किंंंगचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे (व्हीटीए) उपाध्यक्ष रामकिशन ओझा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक अनिलकुमार यांना नुकतेच दिले. व्हीटीएने भारतीय विमानतळ प्राधिकरण, नवी दिल्लीचे चेअरमन आलोक सिन्हा आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांना निवेदन दिले.ओझा यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात विमानतळ आणि सेवांमध्ये सुधारणा झाली आहे, पण पार्किंंंग सुविधेकडे दुर्लक्ष आहे. विमानतळावर पार्किंंंगसाठी चार लाईनमध्ये १२0 वाहनांना समायोजित करण्याची सोय आहे. हे ठिकाण विमानतळ इमारतीलगत आहे. चारही लाईन व्हीआयपींसाठी आरक्षित आहे. त्यानंतर सामान्यांसाठी असलेली पार्किंंंगची व्यवस्था इमारतीपासून १५0 कि.मी. दूर आहे. त्यामुळे वाहनचालक आणि वरिष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पार्किंंंगच्या प्रवेशावर व्हीआयपी पार्किंंंगचा छोटा नोटीस बोर्ड टांगला आहे. लगतच्या राज्यातील आणि शहरातील नागरिकांनी वाहन चुकीने या परिसरात पार्क केल्यास वाहतूक पोलीस पार्किंंंगचे अनेक ब्लॉक रिक्त असतानाही कारवाईच्या नावाखाली गाड्यांना जामर लावतात. या घटना नेहमीच्याच झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कायद्यातील कलम १६ नुसार देशातील सर्व नागरिकांना समानाधिकार प्राप्त असताना केवळ व्हीआयपीसाठी विशेषाधिकार पार्किंंंग का? असा सवाल ओझा यांनी उपस्थित केला आहे. अनिलकुमार यांनी सांगितले की, जामर हे पार्किंंंंग कंत्राटदार लावतो. त्यांना खुल्या पार्किंंंगमध्ये जामर लावण्याचा अधिकार नाही. केवळ विमानतळाच्या इमारतीसमोरील ये-जा मार्गावर केवळ १0 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पार्क केलेल्या वाहनांना जामर लावण्याचा अधिकार आहे. या संदर्भात लक्ष देऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. निवेदन देतेवेळी व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू, सहसचिव हेमंत त्रिवेदी, कार्यकारिणी सदस्य अमरजीतसिंग चावला, राजेश कानुंगो, साकिब पारेख आणि अँड. नितीन गोपलानी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
विमानतळावर पार्किंंंगची असुविधा
By admin | Updated: June 4, 2014 01:11 IST