शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

नागपुरातील  धंतोली, रामदासपेठ भागातील पार्किंगची समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:42 AM

धंतोली व रामदासपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत तसेच बाजारपेठ असल्याने वाहनांची गर्दी असते. या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुक ीची कोंडी निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या रामदासपेठ येथील १८ एकर जागेवर वाहनतळ उभारण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनीही या खर्चाला तसेच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे धंतोली, रामदासपेठ भागातील पार्किंगची समस्या लवकरच सुटणार आहे.

ठळक मुद्दे१२ एकर जागेत वाहनतळ : पाच कोटीच्या खर्चाला मंजुरी : दोन हजार वाहनांची पार्किंग : प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोली व रामदासपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत तसेच बाजारपेठ असल्याने वाहनांची गर्दी असते. या परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुक ीची कोंडी निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या रामदासपेठ येथील १८ एकर जागेवर वाहनतळ उभारण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आयुक्तांनीही या खर्चाला तसेच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्याला मंजुरी दिली आहे. यामुळे धंतोली, रामदासपेठ भागातील पार्किंगची समस्या लवकरच सुटणार आहे.वाहनतळासाठी रामदासपेठ येथील कृषी विभागाची १८ एकर जागा उपलब्ध करण्याबाबतचा प्रस्ताव सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सभागृहात आणला होता. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्याची सूचना केली होती. मंगळवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. बुधवारी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळणार असल्याचा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला.वाहनतळावर उद्यान, रुग्णवाहिकांचे वाहनतळ, अग्निशमन विभागाची वाहने ठेवण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. येथे दोन हजाराहून अधिक वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होणार असल्याने या भागातील वाहतुकीची कोंडी सुटण्याला मोठी मदत होणार आहे.मुख्यालय परिसरात स्वतंत्र शौचालय उभारणारमहापालिका मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे, परंतु प्रशस्त असे शौचालय नाही. यामुळे नागरिकांची अडचण होते. याचा विचार करता येथे प्रशस्त शौचालय उभारले जाणार आहे. यासाठी ५० लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विधी वाचनालयासाठी ५०लाख, बस्तरवारी येथील ई-वाचनालयासाठी ४० लाख, लोकमान्य टिळक अध्ययन कक्षासाठी २५ लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.लाडली लक्ष्मीला संख्या मर्यादा नाहीमहापालिकेने लाडली लक्ष्मी योजनेचे नियोजन बेटी बचाव या उद्देशाने केले आहे. मागील सत्रात लाभार्थींची संख्या एक हजारापर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती. मात्र मागणी विचारात घेता या योजनेच्या लाभार्थींच्या संख्येवरील मर्यादा हटविण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करणाºया सर्व पात्र लाभार्थीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाParkingपार्किंग