शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

नागपुरातील एम्प्रेस मॉलच्या पार्किंगमधील सज्जा पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:02 IST

विविध घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या एम्प्रेस मॉलच्या पार्किंगमध्ये मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. इमारतीच्या बाह्य भागातील एक सज्जा पार्किंगमधील कारवर पडला. यामुळे चार कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील मंडळी काही मिनिटांपूर्वीच तेथून निघून गेली होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे, ही दुर्घटना झाल्यानंतर मॉल प्रशासनाने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आपला उर्मटपणा दाखवला.

ठळक मुद्देचार कारचे नुकसान : मॉल प्रशासनाचा उर्मटपणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या एम्प्रेस मॉलच्या पार्किंगमध्ये मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. इमारतीच्या बाह्य भागातील एक सज्जा पार्किंगमधील कारवर पडला. यामुळे चार कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील मंडळी काही मिनिटांपूर्वीच तेथून निघून गेली होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे, ही दुर्घटना झाल्यानंतर मॉल प्रशासनाने जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आपला उर्मटपणा दाखवला.मॉलमध्ये खरेदी तसेच अन्य दुसऱ्या निमित्ताने येणारी मंडळी एम्प्रेसच्या पार्किंगमध्ये आपापली वाहने लावतात. रोज येथे मोठ्या संख्येत वाहनधारक आपापली वाहने पार्क करतात. त्यासाठी मॉलतर्फे तीन तासांचे ३० रुपये पार्किं ग शुल्कही घेतले जाते. नेहमीप्रमाणे आज सायंकाळी येथे अनेक वाहनधारकांनी आपापली वाहने पार्क केली आणि कुणी खरेदीला तर कुणी सिनेमाला गेले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास आलेल्या वादळ-वाऱ्यामुळे इमारतीच्या पार्किंगच्या बाह्य भागातील सज्जा खाली कोसळला. लांबलचक अन् जाडजूड सज्जामुळे खाली उभी असलेली विटारा ब्रिजा (एमएच ४९/ एएस २६२१) तसेच होंडा सिटी, फियाट लिनिया आणि आय-२० या चार कारचे मोठे नुकसान झाले. विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विटारा ब्रिजा कारची तर पुरती तुटफूट झाली. कारचे छत चपकले, मागचे-पुढचे काच, लाईट चकनाचूर झाले. अन्य कारांचीही अशीच अवस्था होती. विशेष म्हणजे, सज्जा कोसळण्याच्या काही मिनिटांपूर्वीच तेथून एक परिवार आपले वाहन लावून काही अंतरावर गेला अन् ही दुर्घटना घडली. सुदैवाने तेथे त्यावेळी कुणी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.दरम्यान, काम आटोपल्यानंतर कारमालक अग्रवाल पार्किंगमध्ये आले तेव्हा त्यांना त्यांच्या कारसह अन्य कारही तुटफूट झालेल्या दिसल्या. सज्ज्याचा मलबा सर्वत्र पसरला होता.बेजबाबदारीचा कळसअग्रवाल यांनी ही बाब एम्प्रेस मॉल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली असता मॉल प्रशासनाने संतापजनक व्यवहार केला. बेजबाबदार वर्तन करीत तो सज्जा हवेमुळे पडला, त्याला कोण काय करू शकते, असा प्रश्न त्यांनी अग्रवाल यांना केला. हवेमुळे एवढा जाडजूड सज्जा पडू शकत नाही. तो निकृष्ट बांधकामामुळेच पडला, असे अग्रवाल यांनी मॉल प्रशासनाच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी आम्ही काही करू शकत नाही, असे म्हणत निष्काळजीपणाचा परिचय दिल्याचा अग्रवाल यांचा आरोप आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे अग्रवाल आणि अन्य कारमालकांनी रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडे त्यांनी या प्रकरणाची तक्रार दिली. मात्र, वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :Empress Mallएम्प्रेस मॉलnagpurनागपूर