शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सुस्थितीतील पालक मुलांकडून भत्त्यास अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 01:28 IST

हायकोर्टाचा निर्णय, याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या पालकांना निर्वाह भत्ता दिला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी एका प्रकरणात दिला.    आई-वडील व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियमांतर्गत मुलाकडून १० हजार रुपये निर्वाह भत्ता मिळावा, याकरिता चंद्रपूर येथील देवराव व माया बोबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने पालकांची एकंदरीत आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, त्यांना निर्वाह भत्ता दिला जाऊ शकत नसल्याचे सांगून याचिका फेटाळून लावली. सुरुवातीला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी ४ डिसेंबर २०१८ रोजी आणि त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ८ ऑगस्ट २०१९ रोजी दिलासा नाकारल्यामुळे पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.देवराव व माया बोबडे यांना दोन मुले व दोन मुली आहेत. मुलींचे लग्न झाले आहे. देवराव वीज कंपनीत नोकरी करीत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांना मोठी रक्कम मिळाली. त्यांच्याकडे मौजा सागरा येथे १.३८ हे.आर. जमीन असून, तेथून दरवर्षी ४ ते ५ लाख रुपयाचे उत्पन्न होते. तुकुम येथे दोन मजली घर आहे. तेथून १५ हजार रुपये भाडे मिळते. सदर पालक सध्या संजय नामक मुलाकडे राहत असून ते वीज कंपनीत नोकरीला आहेत. 

आंतरजातीय विवाहामुळे नाराजप्रमोद यांनी आंतरजातीय विवाह केला आहे. तसेच, ते जमीन व घरात वाटा मागत आहेत. त्यामुळे पालक नाराज आहेत. प्रमोद सरकारी नोकर असून, ते पुणे येथे राहत आहेत. ते पालकांना पुणे येथे नेऊन त्यांचे पालनपोषण करण्यास तयार आहेत. परंतु, पालक त्यांच्याकडे जाण्यास तयार नाहीत. हे मुद्देही याचिका फेटाळताना विचारात घेण्यात आले. प्रमोदतर्फे ॲड. शिल्पा गिरटकर यांनी कामकाज पाहिले. 

टॅग्स :Courtन्यायालयParenting Tipsपालकत्व