शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचे आ. राहुल पाटील यांच्याकडून जीवाला धोका, विद्यार्थ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By योगेश पांडे | Updated: January 30, 2025 22:38 IST

अकोल्यातील फाउंडेशनमधील गोलमाल प्रकरण तापले

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले म्हणून परभणीचे आ. राहुल पाटील यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा दावा नागपुरात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने केला आहे. संबंधित विद्यार्थी हा अकोला जिल्ह्यातील पातूरमधील नवेगाव येथील प्रियदर्शिनी ग्रामीण व आदिवासी उत्कर्ष फाउंडेशनचा अध्यक्षदेखील आहे. त्याने यासंदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.अथर्व जगन्नाथ ढोणे (२४, गीतानगर, अकोला) असे तक्रारदार विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नागपुरात विधि अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे.

जून २०२४ मध्ये अमरावतीतील कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या एका गुन्ह्याची नोंद झाली होती. संबंधित प्रकरण हे धर्मादाय आयुक्तांची खोटी सही करून न्यायालयाच्या निर्णयाला कागदोपत्री फिरवून भूखंड खरेदी- विक्रीचे होते. यात प्रियदर्शिनी ग्रामीण व अकोला येथील पातूरमधील नवेगावच्या आदिवासी उत्कर्ष फाउंडेशनच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल बिशन खंडारेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. अमरावतीतील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातील अधीक्षक विजय चव्हाण यांनी या प्रकरणात तक्रार केली होती व अथर्व ढोणेने हे प्रकरण समोर आणले होते.

या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणाची शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात बरीच चर्चा झाली होती. हे प्रकरण अकोला जिल्हा न्यायालय, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. या प्रकरणावरून त्याला जीवाला धोका असल्याची भीती वाटत आहे. सद्य:स्थितीत तो तेथील अध्यक्षदेखील आहे. यासंदर्भात त्याने थेट परभणीचे आ. राहुल पाटील यांच्यावरच आरोप लावला आहे. जर मला किंवा प्रियदर्शिनी ग्रामीण व आदिवासी उत्कर्ष फाउंडेशन या संस्थेच्या सदस्यांना काही झाले तर पाटील यांनाच जबाबदार ठरविण्यात यावे, असा दावा त्याने केला आहे. त्याने पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल व अमरावती पोलिस आयुक्तांनादेखील तक्रारीची प्रत पाठविली आहे.

आमदारांचा दावा, चौकशीतून सत्य समोर येईल

यासंदर्भात लोकमतने आ. राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आरोपांचे खंडन केले. माझ्यावर असे आरोप का लावण्यात येत आहेत, याची मला काहीच कल्पना नाही. या प्रकरणात पोलिसच योग्य चौकशी करतील व त्यातून सत्य समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Policeपोलिस