शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पंकज जुनघरे खूनप्रकरण : सर्व सहा जणांना आठ वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:49 IST

क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.पंकज गोपाल जुनघरे (२५, रा. खापा, ता. सावनेर) असे मृताचे नाव असून, आरोपींमध्ये शुभम सुरेश बावनकुळे (२२), सतीश नामदेव जथरे (२०) या दोघांसह अन्य चार विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. खुनाची ही घटना १० एप्रिल २०१७ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नवीन वस्ती खापा येथे घडली होती. १० एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने खापा येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात पंकज त्याच्या मित्रासोबत सहभागी झाला होता. दरम्यान, आरोपीपैकी एकाने पंकजच्या मित्राला धक्का मारला. त्यामुळे मित्राने आरोपीला सहज विचारणा केली.काही वेळाने सहाही जणांनी एकत्र येत पंकजच्या मित्राला मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान, पंकज सर्वांची समजूत काढत भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला. मात्र, त्या सहाही जणांनी पंकजलाच लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्याला लगेच खापा येथीन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.परिणामी, खापा पोलिसांनी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भादंवि ३०४, १४३, १४७ अन्वये गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी संपूर्ण घटनेचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी याच्या न्यायालयात सादर करीत प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दरम्यान, सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचे साक्षपुरावे तपासत तसेच युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना दोषी ठरविले. यात आरोपींना भादंवि ०३४ अन्वये सात वर्षे, भादंवि १४७ अन्वये एक वर्ष व भादंवि १४३ अन्वये चार महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली; शिवाय तिन्ही कलमान्वये एकूण ६,६०० रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेचा भरणा न केल्यास एकूण दोन महिने पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयMurderखून