शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नागपुरातील  दाभा परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 21:01 IST

गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या दाभा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरवली आहे. दरम्यान वन विभागानेसुद्धा परिसरातील नागरिकांना सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिलेल्या आहेत.

ठळक मुद्देसुरक्षा भिंतीची उंची वाढवणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरेवाडा जंगलाला लागून असलेल्या दाभा परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने दहशत पसरवली आहे. दरम्यान वन विभागानेसुद्धा परिसरातील नागरिकांना सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिलेल्या आहेत.गोरेवाडा जंगलाची सुरक्षा भिंत दाभा परिसरातील न्यू शांती ले-आऊट, मडावी ले-आऊटच्या जवळपास ६० ते ७० मीटर अंतरावर आहे. भिंतीची उंची केवळ आठ फूट असून गेल्या पाच दिवसांपासून येथे बिबट ठिय्या आढळून आला आहे. सुरक्षा भिंतीवर दोन ते तीन तास बिबट बसून असल्याचा व्हिडिओसुद्धा काही नागरिकांनी तयार केला आहे. त्याला हाकलून लावण्यासाठी काहींनी दगडाचा माराही केला. मात्र तो जागचा हालला नाही. याबाबत वन अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी गुरुवारी बिबट्याचा शोधही घेतला परंतु तो कुठेच आढळून आला नाही. परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करून ते निघून गेले. वनमंत्र्यांना कळविलेया प्रभागाच्या नगरसेविका दर्शनी धवड यांना बिबट्याबाबत माहिती कळताच त्यांनी नागिरकांची बैठक घेतली. त्यांनी स्वत: या बिबट्याला पाहिले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच वन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही फोन करून संपूर्ण माहिती दिली. मुनगंटीवार यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत सुरक्षा भिंतीची उंची वाढवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :leopardबिबट्याnagpurनागपूर