शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पँगोलिन तस्करीचे जाळे उद्ध्वस्त ! नागपूर DRI कडून छत्तीसगडमध्ये फिल्मी स्टाईल कारवाई; तिघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:11 IST

Nagpur : पँगोलिन तस्करीचे जाळे उद्ध्वस्त! नागपूर DRI कडून छत्तीसगडमध्ये फिल्मी स्टाईल कारवाई; तिघांना बेड्या

नागपूर: वन्यजीवांच्या तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर प्रादेशिक युनिटने एक मोठी मोहीम फत्ते केली आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर येथे सापळा रचून डीआरआयने भारतीय खवले मांजर (पँगोलिन) च्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत तब्बल १६ किलो ५२८ ग्रॅम वजनाचे खवले जप्त करण्यात आले असून, तीन तस्करांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

​अशी झाली कारवाई​गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या नागपूर युनिटने जगदलपूर शहरात ही धडक कारवाई केली. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून या बेकायदेशीर व्यापारात सक्रिय होते. जप्त केलेले खवले आणि अटक करण्यात आलेले आरोपी यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी जगदलपूर वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

​पँगोलिन: जगातील सर्वाधिक तस्करी होणारा प्राणी​कायदेशीर संरक्षण: भारतीय खवले मांजर (Manis crassicaudata) हा प्राणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची-I मध्ये येतो. याला वाघाप्रमाणेच सर्वोच्च संरक्षण प्राप्त असून, याचा व्यापार करणे गंभीर गुन्हा आहे.

​का होते तस्करी?: पँगोलिनच्या खवल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याचा एक मोठा चुकीचा समज (Andhashraddha) आहे. तसेच लक्झरी फॅशन आणि पारंपारिक औषधांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला प्रचंड मागणी असल्याने तस्कर या निष्पाप प्राण्यांची शिकार करतात.

​तस्करीचे जाळे उद्ध्वस्तकरण्यात नागपूर DRI आघाडीवर​२०२५ सालापासून डीआरआय नागपूर युनिटने वन्यजीव तस्करांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधीही या पथकाने अनेक राज्यांत पसरलेली मोठी जाळी उद्ध्वस्त केली आहेत.या ताज्या कारवाईमुळे वन्यजीव तस्करांचे धाबे दणाणले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या या काळ्या बाजाराला नागपूर डीआरआयने मोठा दणका दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pangolin Smuggling Ring Busted in Chhattisgarh; Three Arrested

Web Summary : Nagpur DRI dismantled an international pangolin smuggling racket in Chhattisgarh, seizing 16.5 kg of scales and arresting three individuals. The operation exposed the illegal trade driven by false medicinal beliefs and demand in luxury fashion and traditional medicine markets. The DRI continues its aggressive stance against wildlife trafficking.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी