शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

वनविभाग ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमधून खवले मांजर निसर्गमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 20:54 IST

वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये उपचार सुरू असलेले एक खवले मांजर मंगळवारी निसर्गमुक्त करण्यात आले. अशाप्रकारे सेंटरमधून आतापर्यंत उपचार करून पाच खवले मांजरांना निसर्गमुक्त करण्यात विभागाला यश आले आहे. या पाचपैकी तस्करविरोधात कारवाईत सापडलेले दोन तर रेस्क्यू करून पकडलेल्या तीन मांजरांचा समावेश आहे.

 लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये उपचार सुरू असलेले एक खवले मांजर मंगळवारी निसर्गमुक्त करण्यात आले. अशाप्रकारे सेंटरमधून आतापर्यंत उपचार करून पाच खवले मांजरांना निसर्गमुक्त करण्यात विभागाला यश आले आहे. या पाचपैकी तस्करविरोधात कारवाईत सापडलेले दोन तर रेस्क्यू करून पकडलेल्या तीन मांजरांचा समावेश आहे.मंगळवारी सायंकाळी सर्पमित्रांनी एक खवले मांजर रेस्क्यू करून ट्रांझिट सेंटरमध्ये आणले होते. त्याची तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले. खवल्या मांजराची शिकार आणि त्याच्या खवल्यांच्या तस्करीचे प्रमाण खूप वाढले आहे. खापा आणि कळमेश्वर भागात झालेल्या कारवाईत अशाप्रकारे खवले मांजर ताब्यात घेण्यात आले. याशिवाय वनविभागाच्या पथकाने दिघोरी, हिंगणा एमआयडीसी आदी ठिकाणांहून मांजर रेस्क्यू करून ट्रांझिट सेंटरमध्ये आणले होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.वाघापेक्षा अधिक मागणीमहाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य व मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी दिलेल्या माहितीनुसार खवले मांजराची विदर्भातून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. हा दिसायला भीतीदायक वाटत असला तरी निरुपद्रवी आहे आणि मुंग्या खाऊन जगणारा प्राणी आहे. त्याच्या खवल्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने वैद्यकीय मूल्य अधिक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विदेशात त्याची मागणी आहे. एका अंदाजानुसार वाघापेक्षा त्याची मागणी अधिक असून मोठ्या प्रमाणात त्यांना पकडून तस्करी केली जाते. मात्र वाघाकडे लक्ष देताना इतर प्राण्यांकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी अशाप्रकारे तस्करी निदर्शनास आली तर वनविभागाला सूचना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :forest departmentवनविभागnagpurनागपूर