शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी नाही तर राजकीय लोकांचे पोट भरण्यासाठी पाणंद रस्ते

By गणेश हुड | Updated: May 24, 2024 19:37 IST

निकृष्ट कामामुळे या पाणंद रस्त्यांचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसून राजकीय लोकांचे पोट भरण्यासाठी ही योजना राबवली जात असल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा  राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. 

नागपूर : मातोश्री ग्रामसमृद्धी  पाणंद रस्ते योजना आरोपांच्या भोवऱ्यात अडकली आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असताना २२ मार्चला काही रस्त्यांचे कार्यादेश देण्यात आले. नोंद मात्र ६ मार्चच्या तारखेत करण्यात आली. आमदारांच्या पत्रावर त्यांच्या मर्जीतील ११ ठेकेदारांना ही कामे दिली जात आहे. दुसरीकडे निकृष्ट कामामुळे या पाणंद रस्त्यांचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसून राजकीय लोकांचे पोट भरण्यासाठी ही योजना राबवली जात असल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा  राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. 

मौदा तालुक्यातील पाणंद रस्त्यांचा आढावा घेण्यात आला. कुंदा राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य योगेश देशमुख, तापेश्वर वैद्य यांच्यासह तालुक्यतील जि.प.सदस्य, पंचायत समितीचे सभापती, बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते.  बांधकाम विभागातील  उपअभियंता यांच्याकडून माहिती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली. जिल्ह्यात ७० कोटींचा निधी पाणंद रस्त्यासाठी मंजूर आहे. पाणंद रस्त्यांची कामे ठराविक ११ कंत्राटदारांना दिली जात आहे. आपल्या मर्जीतील कंत्राटदारांनाच कामे मिळावी. यासाठी आमदार पत्र देत आहेत. कार्यादेश नसतानाही काही कामे सुरू आहे. कामे निकृष्ट दर्जाची असून यासाठी मुरुमाचा वापर केला नसल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होणार आहे. असे असतानाही  राजकीय वजन वापरुन लाखो रुपयांची बिलेही काढली जात आहे.  बेरोजगार इंजिनिअरला डावललेपाणंद रस्त्यांच्या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ११ बड्या ठेकेदारांची समिती नियुक्त केली आहे. यातील काही सदस्य स्वत: पाणंद रस्त्यांचे ठेकेदार आहेत. घेतलेल्या कामासाठी उपकंत्राटदार नियुक्त केले आहेत. या कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू आहे. वास्तविक ही कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली असती तर बेरोजगार इंजिनिअर लोकांना काम मिळाले असते. असा आरोप कुंदा राऊत यांनी केला. शेतकऱ्यांचे सहमती पत्र नाही पाणंद रस्त्यांचे काम योग्य प्रकारे झाल्याबाबतचे आजुबाजुच्या  पाच शेतकऱ्यांचे सहमती पत्र आवश्यक असल्याचे पाणंद रस्त्यांच्या निकषात आहे. मात्र कंत्राटदारांनी बोगस कामे केली असल्याने शेतकऱ्यांचे सहमती पत्र न आणता बील काढण्यासाठी राज्कीय वजन वापरले जात असल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केला. जि.प.ची बदनामी कशाला ?पाणंद रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याने व बीलासाठी राजकीय दबाव येत असल्याने जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. त्यामुळे ही कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून न करता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात यावी. अशी भूमिका कुंदा राऊत यांनी मांडली.

टॅग्स :nagpurनागपूर