शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

नागपुरात राजवैभवी थाटात निघाली संत गजानन महाराजांची पालखी परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 10:41 PM

संत गजानन महाराजांचा प्रगटदिन शनिवारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने शहरात पार पडला. त्रिमूर्तीनगर आणि लाकडीपूल परिसरातील गजानन महाराजांच्या मंदिरातून निघालेली पालखी शोभायात्रा राजवैभवी थाटाची ठरली.

ठळक मुद्देदुमदुमला ‘जय गजानन'चा घोषअन्नदान आणि काला-महाप्रसादाचे वितरण; रांगोळ्यांनी मार्ग सजलेतरुणाईचाही उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत गजानन महाराजांचा प्रगटदिन शनिवारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने शहरात पार पडला. त्रिमूर्तीनगर आणि लाकडीपूल परिसरातील गजानन महाराजांच्या मंदिरातून निघालेली पालखी शोभायात्रा राजवैभवी थाटाची ठरली. ‘जय गजानन’ असा जयघोष आणि ‘गण गण गणात बोते’ अशा मंत्रोच्चाराने मंदिराच्या परिसरातील वातावरण भारावले होते. फुलांची उधळण करीत आणि जयघोषात शहरातील अनेक भागातील मंदिरांमधून श्रींचा पालखी सोहळा निघाला. कीर्तन, गोपालकाला, महाप्रसाद आणि कार्यक्रमांचेही ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते.त्रिमूर्तीनगर गजानन मंदिराच्या पालखी सोहळ्यात ८०० दिंड्यांचा सहभागत्रिमूर्तीनगर तलमले इस्टेट भागातील गजानन मंदिरातून शनिवारी सायंकाळी निघालेला संत गजानन महाराजांचा पालखी शोभायात्रा सोहळा यंदाही भाविकांच्या सहभागाने आणि अपार उत्साहाने पार पडला. नागपुरातील विविध भागातून तसेच विदर्भासह मध्यप्रदेशातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दुपारी राजवैभवी थाटात गजानन महाराजांची पालखी निघाली. ८०० च्या वर सहभागी झालेल्या भजनी दिंड्या आणि हजारो भविक हे यंदाच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात झाला. दुपारी साडेचार वाजता श्रींची पालखी अश्व, रथ, मेणा, धूप आणि फुलांच्या वर्षाव करणाऱ्या तोफेसह राजवैभवी थाटात पश्चिम नागपूरच्या परिक्रमेसाठी निघाली. येथे आठवडाभरापासून महोत्सवाद्वारे प्रवचन, आख्यान, कीर्तन झाले. दुपारी महापूजेनंतर शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन मंडळाचे प्रमुख राजू तलमले, मीना तलमले, अशोक धोटे, नगरसेवक लहुकुमार बेहते यांनी केले. त्यानंतर मंदिरातून नगरपरिक्रमेकरिता मार्गस्थ झाली.पालखी मंदिरातून निघून त्रिमूर्ती नगर चौक, पडोळे हॉस्पिटल चौक, गोपाल नगरातून माटे चौक, दुर्गा मंदिर, प्रतापनगर चौक, राधे मंगलम हॉल, एनआयटी गार्डन मार्गे मंदिरात परत आली. अनेक ठिकाणी पालखींची भक्तांनी पूजा केली. मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी भक्तांनी थंड पाणी, मसाले भात, सरबताचे स्टॉल लावले होते. शोभायात्रेतील देखाव्यांचे चित्ररथ, आदिवासी नृत्य आणि स्केंटिग करणारी लहान मुले अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. काटोल, नरखेड, उमरेड, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणांहून आलेल्या ८०० दिंड्या, पालखी, भजनी मंडळे सहभागी झाली. शोभायात्रेनंतर या सर्व भजनी मंडळ आणि दिंड्या प्रमुखांना श्रीफळ, हार आणि प्रमाणपत्र देऊन श्रीकांत पिसे, प्रशांत पिसे, प्रा, रमेश जिभकाटे, राजू मेंघरे, प्रमोद जोशी, चक्रधर बोढारे , विलास गाढवे, यांच्या हस्ते गौरविण्यात आले.रांगोळ्यांनी स्वागतपालखी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळ्या घालण्यात आला होत्या. तरुणाईने आणि महिलांनी मोठ्या उत्साहाने रांगोळ्या घालून मार्ग सजविला होता. मार्गात अनेक ठिकाणी पालखी थांबवून भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. हार, फुले, प्रसाद, नारळांची दुकानेही मंदिर परिसरात सजली होती. दिवसभर रांगा लावून भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजReligious programmeधार्मिक कार्यक्रम