शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी दाम्पत्याची बनवाबनवी, नागपुरात अवैध वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 05:43 IST

व्हिजाची मुदत संपल्यानंतरही भारतात अवैध वास्तव्य करणाऱ्या आणि येथे राहून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एका पाकिस्तानी दाम्पत्याविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देपोलिसांकडे सादर केले बनावट प्रमाणपत्र : जरीपटक्यात गुन्हा दाखल

नागपूर : व्हिजाची मुदत संपल्यानंतरही भारतात अवैध वास्तव्य करणाऱ्या आणि येथे राहून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या  एका पाकिस्तानी दाम्पत्याविरुद्ध जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विक्रमदास भजनदास पंचवानी (वय ४७) आणि जयवंती विक्रमदास पंचवानी (वय ४१), अशी आरोपींची नावे आहेत.

पंचवानी दाम्पत्य पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील घोतकी जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोन महिन्यांपूर्वी ते मुलीच्या उपचाराच्या नावाखाली साक्षी (वय ४), साधना (वय ९), सुरक्षा (वय ११ वर्षे) नामक मुलींसह नागपुरात आले. येथे ते नारा मार्गावरील रुपम सोसायटीत राहत होते. २८ फेब्रुवारीला त्यांच्या व्हिजाची मुदत संपली. त्यानुसार त्यांनी आपल्या देशात परत जायला हवे होते. मात्र, विक्रमदास नागपुरातून निघून गेला तर, इतरांनी येथेच मुक्काम ठोकला. तत्पूर्वी, विक्रमदास आणि त्याच्या पत्नीने सुरक्षा नामक मुलीच्या उपचारामुळे तिला आरामाची गरज असल्यामुळे आणखी एक महिना आम्हाला येथे राहण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज त्यांनी विशेष शाखेत केला. त्यासाठी त्यांनी मेयोतून मिळवलेले मुलीच्या आजार आणि उपचाराचे एक वैद्यकीय प्रमाणपत्रही पोलिसांच्या विशेष शाखेत सादर केले. विशेष शाखेने हे प्रमाणपत्र शहानिशा करण्यासाठी जरीपटका पोलिसांकडे पाठविले आणि चौकशीच्या सूचना केल्या.

मेयोचे प्रमाणपत्र बनावटजरीपटका पोलिसांनी चौकशी केली असता, ते वैद्यकीय प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मेयोतील संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही ते प्रमाणपत्र संबंधित रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांना दिले नसून, तशी आमच्याकडे कोणती नोंदही नसल्याचे सांगितले. अर्थात पंचवानी दाम्पत्याने भारतात अवैध वास्तव्य करतानाच बनावट प्रमाणपत्र देऊन पोलीस प्रशासनाची फसवणूक केल्याचेही स्पष्ट झाल्याने जरीपटका पोलिसांनी या दाम्पत्याविरुद्ध २६ मार्चला कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ भादंवि तसेच विदेशी नागरिक वास्तव्य अधिनियम १९६४ चे सहकलम १४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत