शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

टाळेबंदीच्या औदासीन्यात बहरली चित्रकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 20:27 IST

कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि अनेक जण निराशेच्या सावटात शिरले गेले. मात्र, काही अवलियांनी या टाळेबंदीचे सोने करत इतरांनाही प्रेरणा दिली आहे. नागपुरातील पंकज कावळे या हरहुन्नरी कलाकाराने टाळेबंदीच्या या औदासीन्यात आपल्यातील कलावंताला अधिकच बहर दिला आणि ध्यानीमनी नसताना सहजच ‘ऑनलाईन’ बाजारपेठ त्याचे स्वागत करण्यास सज्ज झाली.

ठळक मुद्देआत्मनिर्भरतेचा धडा : कलेला ‘ऑनलाईन’ बाजारपेठ मिळवत साधला रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यस्त राहणारा माणूस अचानक रिकामा झाला की तो हळूहळू तणावाच्या गर्तेत ढकलला जातो. मात्र, तणावातही जगण्याचे प्रेरणा देते ती कला आणि ती कला जो लीलया आत्मसात करतो तो कलाकार. कोरोनामुळे टाळेबंदी झाली आणि अनेक जण निराशेच्या सावटात शिरले गेले. मात्र, काही अवलियांनी या टाळेबंदीचे सोने करत इतरांनाही प्रेरणा दिली आहे. नागपुरातील पंकज कावळे या हरहुन्नरी कलाकाराने टाळेबंदीच्या या औदासीन्यात आपल्यातील कलावंताला अधिकच बहर दिला आणि ध्यानीमनी नसताना सहजच ‘ऑनलाईन’ बाजारपेठ त्याचे स्वागत करण्यास सज्ज झाली.

व्यावहारिक जगात कामात असताना प्रत्येकालाच सुटी हवी असते. मात्र, जबरी सुटीवर पाठविल्यास तोच माणूस निराशेच्या गर्तेत शिरायला लागतो. टाळेबंदीच्या अडीच महिन्यात अशी स्थिती अनेकांची झाली आहे. मात्र, ड्रॉइंग टीचर असलेल्या पंकज कावळे यांनी टाळेबंदीलाच अस्त्र बनविले आणि पेपरवर्क, कॅन्व्हास पेंटिंग, ऑईल पेंटिंग, ग्राफिक्सचे स्केच रेखाटत कोरोनाचा हा बेरंगी काळ रंगाने भरून काढला. सर्वसामान्य माणसांप्रमाणेच त्यांनी आपल्या कलाकृती रोज फेसबुक आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या प्रचंड अशा फावल्या वेळेत आपण काय करतो आहोत, हेच दाखविण्याचा हा उद्देश होता. मात्र, आपल्या अभिव्यक्तीशी प्रामाणिक राहिल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते, असे म्हणतात. नेमके तसेच झाले आणि त्यांच्या प्रत्येक पेंटिंग्जला आॅनलाईन ग्राहक प्राप्त झाले. या अडीच महिन्यात जवळपास अडीचशे पेंटिंग्ज त्यांनी काढल्या. त्यातून जवळपास दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी अशा या उदासीनतेने ग्रासलेल्या काळात मिळवले. ‘बेरंगी दुनिया में रंग ढूंढना सीखो, उदासीन जिंदगी में जिंदगी ढूंढना सीखो’ अशीच बाब कावळे यांच्या या कलावैभवावरून स्पष्ट होते.वेळ रिकामा होता, मी नाही : पंकज कावळेमी कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर ड्रॉइंग टीचर आहे. टाळेबंदीत सुट्याच सुट्या होत्या आणि बाहेरही पडता येत नव्हते. भरपूर वेळ रिकामा असल्याने, याचा उपयोग अभिव्यक्ती बहरविण्यासाठी केला आणि कलाही बहरत गेली आणि बाजारपेठही. आता तर संधीच मिळाली आहे. त्यामुळे या कामाला जास्तीत जास्त वेळ देणार आहे. मी नाटक, सिनेमा या क्षेत्रातही संधी शोधत असल्याचे चित्रकार पंकज कावळे म्हणाले.

टॅग्स :painitingsपेंटिंगnagpurनागपूर