शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

रंग विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील उडाले रंग; टाळेबंदीमुळे व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 10:53 IST

Nagpur News कोरोना संसर्गामुळे २१ मार्चपर्यंत टाळेबंदी कठोर आहे. संसर्गाचा प्रकोपही वाढतोच आहे. त्यामुळे, टाळेबंदीबाबत संभ्रमही कायम आहे. त्यामुळे, रंग-गुलालाचा व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती आहे.

ठळक मुद्देगोदामांत पडलीय कोट्यवधींची सामग्री

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २८ मार्चला होलिका दहन आणि २९ मार्चला धुळवड आहे. कोरोना संसर्गामुळे २१ मार्चपर्यंत टाळेबंदी कठोर आहे. संसर्गाचा प्रकोपही वाढतोच आहे. त्यामुळे, टाळेबंदीबाबत संभ्रमही कायम आहे. त्यामुळे, रंग-गुलालाचा व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती आहे. गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांचे रंग-गुलाल, पिचकारी, मुखवटे, पोंगे आदी पडलेले आहेत. दुकाने बंद असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडालेले आहेत. साठवणूकदरांचा किरकोळ व्यापारी, ठोक व्यापाऱ्यांशी संपर्क होत नाही. खरेदी केल्यानंतर गुंतवणूक तरी निघेल का, हा प्रश्न व्यापाऱ्यांच्या मनात आहे. अशा संभ्रमावस्थेमुळे सर्वच बेजार झाले आहेत.

२१ मार्चनंतर टाळेबंदी आणखी वाढली तरी ठोक व्यापाऱ्यांचा तोटा निश्चित आहे. डिसेंबरपर्यंत कोरोना नियंत्रणाची शक्यता वाढल्यामुळे, अन्य जिल्ह्यांतून रंग व गुलालाची सामग्री मागवण्यात आली होती. परंतु, ऐन उत्सवाच्या काळात पुन्हा टाळेबंदी झाली आणि व्यापारी वर्ग संकटात सापडला आहे. २२ मार्चनंतर टाळेबंदी संपेल आणि बाजारपेठा उघडल्यावर किमान गुंतवणूक तरी निघेल, अशी अपेक्षा व्यापारी करत आहेत.

रंगांचे ठोक व्यापारी श्वेतांग खोब्रागडे यांनी सांगितल्यानुसार, कोरोना संक्रमणामुळे व्यापारातील व्यवहारात परिवर्तन आले आहे. सामग्रीसाठी ॲडव्हान्स देणे गरजेचे असते. दिवाळीनंतर होळीची तयारी सुरू होत असते. रंगांचे निर्माण आणि व्यवसाय सुरू होतो. डिसेंबरपासून ठोक व्यापाऱ्यांनी सोलापूर आदी ठिकाणांहून रंग, गुलाल, पिचकारी, मुखवटे आदी मागवण्यास सुरुवात केली होती. त्याचे पेमेंटही दिले गेले आहे. आता व्यापारच बंद पडल्याने लागत काढणेही कठीण झाले आहे.

दुसऱ्या जिल्ह्यांतून व्यापारी येण्यास कचरत आहेत

नागपुरात स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच नजीकच्या जिल्ह्यांतून किरकोळ व्यापारी रंग आणि अन्य सामग्री घेण्यास येत असतात. महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने कठोर निर्देश दिले असल्याने, अन्य राज्यांतील व्यापारीही नागपुरात पोहोचत नाहीत. स्थानिक किरकोळ व्यापारीही टाळेबंदी संपण्याची वाट बघत आहेत.१० टक्क्यांचीसुद्धा विक्री नाही

होळीपूर्वी दोन महिने आधी रंगांचा व्यापार सुरू होत असतो. किरकोळ व्यापारी, ठोक व्यापाऱ्यांशी संपर्क साधत असतात. दोन आठवड्यापूर्वी खरेदी-विक्रीला गती प्राप्त होते. पंरतु, कोरोनामुळे यंदा दहा टक्केही व्यवहार झालेले नाहीत. ९० टक्के सामग्री ठोक व्यापाऱ्यांकडेच पडून आहे.

.............

टॅग्स :Holiहोळी