शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पहुर विकास आघाडी  म्हणते, मनं काय जोडता; नदी जोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 21:54 IST

सध्या ‘मन की बात’वर जोरदार चर्चा केली जाते. त्याद्वारे काय साध्य होणार, त्याचे फलित काय, हा प्रश्नच आहे. खरंच ‘मन की बात’ केल्याने मनं जुळतात काय, मनं जोडण्याऐवजी नदी जोडा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ही आशा आहे जामनेर (जि. जळगाव) येथील पहुर विकास आघाडीला.

ठळक मुद्देउपोषणाचे सहावे वर्ष : न्याय कधी मिळणार?

गणेश खवसे ऑनलाईन लोकमतनागपूर : सध्या ‘मन की बात’वर जोरदार चर्चा केली जाते. त्याद्वारे काय साध्य होणार, त्याचे फलित काय, हा प्रश्नच आहे. खरंच ‘मन की बात’ केल्याने मनं जुळतात काय, मनं जोडण्याऐवजी नदी जोडा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ही आशा आहे जामनेर (जि. जळगाव) येथील पहुर विकास आघाडीला. नदी जोड प्रकल्पासाठी या आघाडीतर्फे सातत्याने धरणे आंदोलन, उपोषण केले जात आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा ही समिती न्याय्य हक्कासाठी मैदानात उतरली आहे. या संघटनेचे आंदोलनाचे हे सहावे वर्ष आहे, हे विशेष!तापी ते वाघूर नदी जोड प्रकल्प राबविण्यात यावा, या मागणीसाठी सुकलाल बारी यांच्या नेतृत्वात गेल्या सहा वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, बोदवड, सोयगाव ही चारही तालुके कमी पर्जन्यमान क्षेत्रात येतात. त्यामुळे या तालुक्यांमध्ये सतत दुष्काळसदृश स्थिती असते. या तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी ७०० फुटांपर्यंत खालावलेली असून भविष्यात पाण्याची गंभीर समस्या उद्भवणार आहे.पिण्यासाठीच पाणी मिळणार नाही तिथे सिंचनासाठी तरी मिळणार काय, हा बिकट प्रश्न आहे. यामुळे यातून वाचण्यासाठी ‘नदी जोड’ प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. मुक्ताईनगरपासून आलेल्या तापी नदीतील पाणी कांग नदीत आणि वाघूर नदीत पाटाद्वारे टाकावे. त्यामुळे वाघूर नदीत पाणी येऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. विहिरी, तलावांमध्ये पाणी राहील. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊन सिंचनासाठी त्याचा मोठा हातभार लागून शेतकरी संपन्न होईल. ही बाब पटवून देण्यासाठी धरणे आंदोलन, साखळी उपोषण, आमरण उपोषण असे आंदोलनाचे अस्त्र वापरून वाघूर विकास आघाडीने शासनाचे लक्ष वेधले. परंतु त्याचा काहीएक फायदा झालेला नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील आणि त्यांच्याच मतदारसंघात चक्क पाणी मिळण्यासाठी अशाप्रकारचे आंदोलन करावे लागत आहे, हे विशेष! हिवाळी अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा वाघूर विकास आघाडीतर्फे धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यात सुकलाल बारी यांच्यासह भाऊराव गोंदनखेडे, रमेश पाटील, गजानन पाटील, अशोक जाधव, रामचंद्र पाटील, रवींद्र पांढरे, सुनील सोनार, भागवत पाटील, डॉ. मनोहर पाटील आदी सहभागी झाले आहेत.वैयक्तिक नव्हे जनहिताची मागणी!हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे - आंदोलन, उपोषण मंडपांनी पटवर्धन मैदान व्यापले आहे. धरणे आंदोलन करणाºया संघटना हा विशेषत: वैयक्तिक, स्वत:च्या मागण्यासाठी किंवा समाजाच्या, एका विशेष वर्गाच्या मागण्यांसाठी मैदानात उतरल्या आहेत. मात्र वाघूर विकास आघाडीतर्फे वैयक्तिक नव्हे तर जनहिताच्या मागणीसाठी साखळी उपोषण केले जात आहे. नदी जोड प्रकल्प राबविल्यास उपोषणकर्त्यांना त्याचा फायदा होणार असून त्यांच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना हितकारक ठरेल, हे विशेष! याच मागणीसाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रत्येक हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन, उपोषण करण्यात येत आहे. २०१२ मध्ये आमरण उपोषणाचा मार्गही सुकलाल बारी यांनी पत्करला. दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तीन दिवस रुग्णालयात तर एक दिवस पोलीस ठाण्यातही ठेवले. परंतु त्यानंतरही त्यांनी आंदोलनाचा मार्ग जनहितासाठी सोडला नाही. नदी जोड प्रकल्प राबवित नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.

टॅग्स :riverनदीNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशन