शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावत’चा वाद, नागपूरच्या मॉल्समध्ये तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:08 IST

पद्मावत हा हिंदी चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. परंतु या चित्रपटाबाबतचा वाद अजूनही संपलेला नाही. चित्रपटाला विरोध सुरूच आहे. बुधवारी काही चित्रपटगृहांमध्ये त्याचा प्रीव्ह्यू शो आयोजित करण्यात आला होता. यासाठी बुधवारपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला.

ठळक मुद्देराजपूत करणी सेना व बजरंग दलाची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पद्मावत हा हिंदी चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. परंतु या चित्रपटाबाबतचा वाद अजूनही संपलेला नाही. चित्रपटाला विरोध सुरूच आहे. बुधवारी काही चित्रपटगृहांमध्ये त्याचा प्रीव्ह्यू शो आयोजित करण्यात आला होता. यासाठी बुधवारपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. परंतु राजपूत करणी सेना व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत आपला विरोध दर्शविला. मॉलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे ज्या मॉलमध्ये हा चित्रपट लागला आहे, त्याला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे.सीताबर्डी येथील इटर्निटी मॉलसमोर बुधवारी श्री राजपूत करणी सेनाचे नागपूर शहर अध्यक्ष प्रमोदसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. नारेबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करण्याच्या उद्देशाने मॉलमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना पकडून अंबाझरी पोलीस ठाण्यात नेले. तसेच गांधीसागर तलावाजवळील एम्प्रेस सिटी मॉल येथे अगोदरच पोलिसांनी बंदोबस्त केला होता. असे असतानाही चित्रपटाला विरोध करणारे कार्यकर्ते मॉलमध्ये घुसले आणि त्यांनी नारेबाजी केली. पोलिसांच्या माहितीनुसार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. प्रमोदसिंह ठाकूर यांच्यासह पवन सिंह, गणेश नामदेव सिंह, पंकज परमार, शत्रुघ्न सिंह आदी कार्यकर्त्यांचा निदर्शनकर्त्यांमध्ये समावेश होता.

टॅग्स :Padmavatपद्मावतPoliceपोलिस