शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

५३ टक्के रुग्णांची ऑक्सिजन पातळी धोकादायक स्थितीत होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 10:58 IST

Nagpur News कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढविणारा आहे. नागपूर जिल्ह्यात ४,९७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकट्या मेडिकलमध्ये २४७२ मृत्यू झाले.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये कोरोना मृत्यूचे ‘ऑडिट’ग्रामीणमधील ५७७, जिल्हा बाहेरील २५९ तर इतर राज्यातील ८१ रुग्णांचा मृत्यू

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढविणारा आहे. नागपूर जिल्ह्यात ४,९७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकट्या मेडिकलमध्ये २४७२ मृत्यू झाले. यात नागपूर ग्रामीणमधील ५७७, जिल्हाबाहेरील २५९ तर इतर राज्यातील ८१ रुग्ण होते. याला घेऊन मेडिकलने केलेल्या मृत्यूच्या ‘ऑडिट’मध्ये भरती होऊनही पाच दिवसापर्यंत ५३.७ टक्के रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण धोकादायक स्थितीत होते. मृत्यूमागे या कारणासोबतच मेडिकलमध्ये पोहचण्यास झालेला उशीर, सुरुवातीच्या दिवसात न मिळालेला योग्य उपचार व औषधांचा तुटवडा आदी कारणेही पुढे केली जात आहे.

कोरोनाचा पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. मेडिकलमध्ये जानेवारी ते ३१ मे या दरम्यान ६३४७ कोरोनाचे गंभीर रुग्ण भरती झाले. यातील ३८ टक्के रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. हा आकडा मोठा असल्याने स्वत: मेडिकलने पुढाकार घेत त्या मागील कारणांचा शोध घेणे सुरू केले आहे. यात मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या कोरोनाबाधितांपैकी केवळ ११ टक्के रुग्णांची ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. शिवाय, १५ टक्के म्हणजे, ३६८ रुग्ण मृतावस्थेत दाखल झाले. तर, ४६९ रुग्ण (१९ टक्के ) गंभीर होऊन आल्याने त्यांचा २४ तासांच्या आतच मृत्यू झाला.

-ग्रामीणमधील ६० रुग्ण ‘ब्रॉट डेड’

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातून मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांमध्ये ६० रुग्ण ‘ब्रॉट डेड’ म्हणजे रुग्णालयात मृतावस्थेत दाखल झाले, तर पहिल्या २४ तासांत १२८ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांमध्ये उमरेडमधील ५३, काटोलमधील ३८, सावनेरमधील ५१, रामटेकमधील ३०, कुहीमधील ३०, हिंगण्यामधील २६, कामठीतील १७, पारशिवनीतील ७, भिवापूरमधील ११, कोराडीतील १५, खापरखेडामधील १६, बुटीबोरीतील १०, कळमेश्वरमधील ३०, मौदामधील १२, वाडी (ग्रामीण)मधील २९, नरखेडमधील २१, दहेगावमधील ४, भिलगावमधील ६, कन्हानमधील ५, बोरखेडीमधील १, पाटणसावंगीमधील २, मकरधोकडामधील २ व इतर ग्रामीण भागातून १६३ असे एकूण ५७७ रुग्णांचा मृत्यूची नोंद आहे.

-भंडारा जिल्ह्यातील ६२ रुग्णांचा मृत्यू

जानेवारी ते मे या दरम्यान जिल्हाबाहेरील रुग्णांमध्ये भंडारा जिल्ह्यातील सर्वाधिक ६२ रुग्णांचे मेडिकलमध्ये मृत्यू झाले आहेत. या शिवाय, अकोला जिल्ह्यातील १०, अमरावती जिल्ह्यातील ३२, बुलडाणा जिल्ह्यातील ३, चंद्रपूर जिल्ह्यातील ५८, गडचिरोली जिल्ह्यातील १३, गोंदिया जिल्ह्यातील १७, जळगाव जिल्ह्यातील १, मुंबई येथील, वर्धा जिल्ह्यातील ४६, यवतमाळ जिल्ह्यातील १३, वाशिम जिल्ह्यातील २ तर नाशिक जिल्ह्यतील १ असे एकूण २५९ मृत्यू आहेत.

-मध्य प्रदेशातील ६९ रुग्णांचे गेले बळी

आजूबाजूच्या राज्यातील कोरोनाचा रुग्णांनी मेडिकलमध्ये उपचार घेतले. यात मध्य प्रदेशातील ६९, छत्तीसगड येथील ५, उत्तर प्रदेशातील ३, झारखंड येथील ३ तर बिहार येथील १ असे एकूण ८१ रुग्णांचे बळी गेले आहेत. या मागेही रुग्ण गंभीर होऊन व गुंतागुंत वाढल्यावर मेडिकलमध्ये दाखल झाल्याची कारणे दिली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस