शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात   मांजात अडकून घुबड जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:20 IST

मानेवाडा येथील वंदेमातरम् कॉलेज जवळील अवधूत नगरात राहणारे गोपाल धांडे यांच्या घरी मंगळवारी सकाळी एक पांढऱ्या रंगाचे घुबड मांजात अडकून जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानेवाडा येथील वंदेमातरम् कॉलेज जवळील अवधूत नगरात राहणारे गोपाल धांडे यांच्या घरी मंगळवारी सकाळी एक पांढऱ्या रंगाचे घुबड मांजात अडकून जखमी झाले. त्याला तातडीने मदत मिळवून मुक्त केले व उपचारासाठी पाठविण्यात आले.सकाळी ९ वाजताच्या दरम्यान धांडे यांच्या घरी असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये एक जखमी घुबड कोसळले.याची माहिती सर्पमित्र आणि पक्षिमित्र शुभम पराळे याला अन्य पक्षिमित्र आशिष मेंढे यांच्याकडून कळली. शुभमने घटनास्थळी धाव घेऊन जखमी घुबडाला मांजातून मुक्त केले. त्याच्या पायाला जबर दुखापत झालेली होती. त्यामुळे वन विभागाच्या रेस्क्यु पथकाला या संदर्भात सूचना देऊन त्याच्यावर उपचार करण्याची विनंती केली. वनरक्षक मुसळे यांनी सहकाऱ्यांसह येऊन घुबडाला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रवाना केले.या परिसरातील विजेच्या खांबावर नॉयलॉन मांजा गुंतला होता. त्यात अडकल्याने हे घुबड जखमी होऊन खाली पडले. त्यामुळे त्याच्या पायाला जबर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले.मकरसंक्रांतीचा आनंद पक्ष्यांच्या जीवावरजानेवारी महिना आला की पतंगबाजी सुरू होते. मकरसंक्रातीच्या काळात तर मोठ्या प्रमाणावर पतंग उडविल्या जातात. यात नॉयलॉन मांजा वापरला जात असलयाने पक्ष्यांची मोठी हानी होते. बरेचदा दुचाकीवरून जाणारे नागरिकही जखमी होतात. हे अपघात टाळण्यासाठी साधा मांजा वापरा, असे आवाहन सर्पमित्र शुभम पराळे याने के ले आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूरkiteपतंग